Astrology : निर्जला एकादशीला नव पंचम राजयोगाची निर्मिती, 'या' राशींचे उजळेल भाग्य

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 01:07 PM)

Astrology : निर्जला एकादशी 25 जून 2026 रोजी साजरी केली जाईल. हा विशेष दिवस भगवान विष्णूच्या पूजेचं, तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, दृष्टीकोनातून अत्यंत दुर्मिळ असलेल्या नव पंचम राजयोगाची निर्मितीचे प्रतीक आहे, अशातच जाणून घेऊयात काही राशींचे भविष्य. 

follow google news
Astrology

1/5

ज्येष्ठ महिन्याच्या शुल्क पक्षात निर्जला एकादशी 25 जून 2026 रोजी साजरी केली जाईल. हा विशेष दिवस भगवान विष्णूच्या पूजेचं, तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, दृष्टीकोनातून अत्यंत दुर्मिळ असलेल्या नव पंचम राजयोगाची निर्मितीचे प्रतीक आहे, अशातच जाणून घेऊयात काही राशींचे भविष्य. 
 

Astrology

2/5

वृषभ 

वृषभ राशीसाठी नवपंचम राजयोगाचा काही राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये लक्षणीय वाढ होईल.  बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल आणि तुम्ही व्यवसाय क्षेत्रात असाल, तर फायदेशीर सौदा निश्चित होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळेल. 
 

Astrology

3/5

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात अचानकपणे लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. या लोकांना  विविध स्त्रोतांमधून आर्थिक लाभ मिळेल, तसेच व्यवसाय किंवा नोकरीसंबंधित प्रवास भाग्यवान ठरेल. 
 

Astrology

4/5

कन्या 

कन्या राशींच्या व्यक्तींसाठी शेअर बाजार, लॉटली किंवा जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच सामाजिक दर्जा वाढेल.

Astrology

5/5

कुंभ 

राशीचे स्वामी स्वत: भाग्यवान शनिदेव असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. या नवपंचम राजयोगामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास आणि सन्मान वाढेल. वडिलोपार्जित बाबी आणि वैयक्तिक जीवनसंबंधित वाद मिटतील.  
 

हे वाचलं का?