शनीची वक्री गती आणि गुरूचा अस्त एकत्र, 'या' राशी अडचणीत येतील
मुंबई तक
• 12:54 PM • 29 Jun 2026
Astrology : या महिन्यात, दोन सर्वात महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. याचा थेट परिणाम हा संपूर्ण जगावर आणि सामान्य लोकांच्या जीवनावर होणार आहे, अशातच जाणून घ्या एकूण राशींचे भविष्य.
ADVERTISEMENT


1/4
जुलै 2026 महिना अवकाश आणि ज्योतिषशास्त्रानुसार जगभरात मोठी खळबळ उडवणार आहे. या महिन्यात, दोन सर्वात महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. याचा थेट परिणाम हा संपूर्ण जगावर आणि सामान्य लोकांच्या जीवनावर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, याच महिन्यात न्यायाची देवी शनी प्रतिगामी भ्रमण करणार असून, देवांचा गुरू ग्रह अस्तंगत होणार आहे.


2/4
कुंभ
शनि ग्रह हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे, त्याच्या वक्रीच्या गतीमुळे तुमच्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. याच काळात तुमचा आत्मविश्वास कमी होण्याची अधिक शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वाद आणि मदभेत निर्माण होण्याची शक्यता आहे. याच काळात कोणीही मोठी गुंतवणूक करणे टाळा, यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं.
ADVERTISEMENT


3/4
सिंह
सिंह राशींच्या लोकांसाठी शनीच्या वक्री गतीमुळे चिंता वाढेल. तुमच्या वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्य आणि समन्वय अभास असू शकतो, तणाव निर्माण होईल. नोकरी आणि व्यवसायातील कठोर परिश्रमानंतर फळ मिळण्यास थोडा विलंब होईल.


4/4
धनु
धनु राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. खोळंबलेली कामे आणखी खोळंबू शकतात. पैसे खर्च करताना विचार करून निर्णय घ्यावा. लांब प्रवास करत असाल, तर सावधगिरी बाळगावी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT











