Astrology : व्यतिपात योगाची निर्मिती होणार, 'या' राशींवर मोठे आर्थिक संकट घोंघावणार

मुंबई तक

• 01:08 PM • 24 Jun 2026

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 10 जुलै रोजी तयार होणारा व्यतिपत योग एक विशेष परंतु संवेदनशील योग मानला जातोय. द्रिक पंचांगानुसार, त्याचे परिणाम हे सकाळी 6:53 वाजता सुरू होईल. तर दुपारी 12:27 पर्यंत टिकतील. सूर्य आणि चंद्र ग्रहाच्या विशिष्ट खगोलिय स्थितीमुळे तयार होणारा हा योग अनेक प्रकारे आव्हानात्मक मानला जातो. याचा विचार करण्याच्या पद्धतीवर, निर्णयक्षमता, आर्थिक बाबी आणि मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. 

follow google news
Astrology

1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 10 जुलै रोजी तयार होणारा व्यतिपत योग एक विशेष परंतु संवेदनशील योग मानला जातोय. द्रिक पंचांगानुसार, त्याचे परिणाम हे सकाळी 6:53 वाजता सुरू होईल. तर दुपारी 12:27 पर्यंत टिकतील. सूर्य आणि चंद्र ग्रहाच्या विशिष्ट खगोलिय स्थितीमुळे तयार होणारा हा योग अनेक प्रकारे आव्हानात्मक मानला जातो. याचा विचार करण्याच्या पद्धतीवर, निर्णयक्षमता, आर्थिक बाबी आणि मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. 
 

Astrology

2/5

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतो. खर्चात अचानक वाढ झाल्याने बजेटवर मोठा परिणाम होऊ शकतो, यामुळे मोठा खर्च देखील होईल. गुंतवणूक करणे किंवा मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळणे उत्तम राहील. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही, ज्यामुळे प्रियजनांसोबत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच मानसिक ताण वाढू शकतो. तसेच या व्यतिरिक्त, डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात. 
 

Astrology

3/5

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना या काळात घाईने निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी किंवा पडताळणी न करताच सह्या करू नका.  व्यवसायिक बाबींमध्ये सावधगिरीने वागावं. लहान बाबींमुळे मोठे फायदे होण्याची शक्यता आहे.
 

Astrology

4/5

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना मानसिक ताण आणि कामाचा भार निर्माण होईल. नोकरदारांवर जबाबदारी वाढल्याने मानसिक ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी समन्वय साधणे गरजेचे आहे. नवरा-बायकोच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी 10 जुलै हा दिवस नवीन प्रकल्प, गुंतवणूक किंवा व्यवसायिक व्यवहार सुरू करण्यासाठी अनुकूल मानला जात नाही. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. याच काळात मालमत्ता वाहनांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित निर्णय पुढे ढकलणे शहाणपणाचे ठरेल.  
 

हे वाचलं का?