बॉम्बेचं मुंबई आणि Poona चं पुणे नाव बदलल्याचा फरक काय?, अंकशास्त्रज्ञांनी दिली माहिती

मुंबई तक

• 08:00 AM • 19 Jul 2026

Navneet Manadhani : अंकशास्त्राकडे अनेकांचा पाहण्याचा कल अधिक आहे. याच अंकशास्त्राचा माणसाच्या आयुष्यावर काही प्रमाणात परिणाम घडलेला जाणवू लागतो, अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांनी मुंबई तक बैठक कार्यक्रमात मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी अंकशास्त्राच्याबाबतीत अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांनी पुढे मुंबई आणि पुणे शहरांची नावे बदलण्यामागचा परिणाम देखील सांगितला होता. 

Navneet Manadhani

Navneet Manadhani

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईला दुबईहून अधिक पसंती

point

पुनाचं पुणे नाव बदलल्याने काय फरक पडला? 

point

बॉम्बेचं मुंबई नाव 

Navneet Manadhani : अंकशास्त्राकडे अनेकांचा पाहण्याचा कल अधिक आहे. याच अंकशास्त्राचा माणसाच्या आयुष्यावर काही प्रमाणात परिणाम घडलेला जाणवू लागतो, अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांनी मुंबई तक बैठक कार्यक्रमात मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी अंकशास्त्राच्याबाबतीत अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांनी पुढे मुंबई आणि पुणे शहरांची नावे बदलण्यामागचा परिणाम देखील सांगितला होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : रामरक्षा येते का? CM फडणवीसांचा प्रश्न, उद्धव ठाकरेंचं खरमरीत उत्तर म्हणाले...

मुंबई आणि गुजरात राज्याच्या स्थापनेचा 1 मे हा दिवस आहे. तरीही महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत एक नंबरवर आहे. जोवर भारत देश आहे तोवर महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत एकच नंबरवर राहिल, मात्र त्याला नेते चांगले मिळणंं गरजेचे आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून मंत्रालयाच्या वास्तूला दक्षिण-पश्चिम भाग लाभलेला असल्याने त्याचा फायदा शहराला होतोय. 

मुंबईला दुबईहून अधिक पसंती

भारताची प्रगती पाहून मुंबईला दुबईहून अधिक पसंती दिली जाऊ शकते. जर या राज्याला नेते चांगले मिळाले तर मुंबई आणि पुणे या दोन शहरांत मोठा विकास होईल, असं अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी म्हणाले. यानंतर त्यांनी शहरांच्या बदललेल्या नावांबाबतची माहिती दिली. 

पुनाचं पुणे नाव बदलल्याने काय फरक पडला? 

बॉम्बेचं मुंबई आणि पुनाचं पुणे असं नाव केल्यानं नेमका काय फरक पडतो? असा प्रश्न विचारल्यानंतर नवनीत मनधानी यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "हो फरक पडतो. पुण्यात अनेक बिल्डर्स आहेत, त्यांना विचारा की, पुनाचं पुणे नाव बदलण्यात आलं. पुण्याची स्पेलिंग ही 24 वर येते. पुण्यातील जमिनीचे रेट्स हे एकरमधून स्क्वेअरफुटमध्ये कोणाचे झाले असतील ते शहर पुणे आहे. यामुळे नावाच्या बदलाचा परिणाम शहरावरती झाला.  

हे ही वाचा : सोनम वांगचुक यांना उचललं, अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

बॉम्बेचं मुंबई नाव 

बॉम्बेचं मुंबई हे नाव झालं होतं, याचा काही प्रमाणात फरक जरी पडला असला तरीही मुंबईत नैसर्गिक आपत्ती येते. या नैसर्गिक अपत्तीमुळे मोठं नुकसान होतं. यात दोन विचार प्रवाहातील लोक आहेत, ज्यात मूळ महाराष्ट्रीयन आणि इतर लोक आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, मी स्वत: एका कंपनीचा डायरेक्टर आहे, आम्ही आमच्या कंपनीचं देखील नाव बदललं होतं तर आमच्या कंपनीचा फायदा 21 कोटी होता तो नंतर 260 कोटींवर आला, याच नाव बदलण्याचा परिणाम हा सजीव आणि निर्जीवांवर होताना दिसतो.