'उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची, योगींसाठी कठीण काळ', नवनीत मनधानी काय म्हणाले?

मुंबई तक

• 07:00 AM • 27 Jul 2026

Navneet mandhaani : अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी मुंबई तक बैठकीत आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी कार्यक्रमात येऊन आपली मुलाखत देखील दिली होती. देशाची पुढील राजकीय स्थिती उत्तर प्रदेशच्या राजकारणावरून ठरवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Navneet mandhani

Navneet mandhani

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'देशासाठी उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची'

point

'योगी आदित्यनाथ यांचा काळ अवघड'

Navneet Mandhaani : अंकशास्त्रज्ञ नवनीत मनधानी यांनी मुंबई तक बैठकीत आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी कार्यक्रमात येऊन आपली मुलाखत देखील दिली होती. त्यांनी राज्यातील तरुण राजकारणी आणि अनुभवी राजकारणी मंडळींच्या मूलांकाबाबत माहिती दिली होती. एवढंच नाही,तर त्यांनी राजकीय नेत्यांच्या स्वाक्षरीवरीबाबत लॉजिक सांगितलं. अशातच त्यांनी देशाची पुढील राजकीय स्थिती उत्तर प्रदेशच्या राजकारणावरून ठरवली जाणार असल्याचं सांगितलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सोलापूर हादरलं! 14 वर्षीय मुलीसह आईने रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन

'देशासाठी उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची'

ते म्हणाले की, मी काही प्रमाणात राजकारण पाहत असतो. यात उत्तर प्रदेशची निवडणूक फार महत्त्वाची असणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काळ अवघड असणार आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकीत काही घडलं तर लोकसभेला काँग्रेसच्या सीट आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

कोण होणार आगामी पंतप्रधान? 

मात्र, असं असलं तरीही 2029 मध्ये काँग्रेसकडून राहुल गांधी हे पंतप्रधान होणार नाहीत. तसेच दुसरीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेसच्या जागेत अधिक वाढ होईल, मात्र 2029 मध्ये भाजपचीच सत्ता येणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं मानधानी म्हणाले. 

हे ही वाचा : विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींच्या पत्रातून अमित शाहांना दोन तिखट सवाल

येणाऱ्या काळात नेमकं कोण पंतप्रधान होईल, हे सांगू शकत नाही. मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत, असं माझं शास्त्र सांगतं, अशी माहिती मनधानी यांनी दिली.