Personal Finance:: घाबरायचं नाही... युद्धाचं तर टेन्शनच घेऊ नका! गुंतवणूकदारांसाठी 2 Golden सल्ले!

Operation Sindoor Impact On Share Market : जेव्हापासून सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे, भारतीय शेअर बाजारावर (Stock Market) त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

India vs Pakistan, Impact On Share Market

India vs Pakistan, Impact On Share Market

मुंबई तक

• 07:33 AM • 08 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑपरेशन सिंदूरचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला का?

point

भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास शेअर मार्केट आपटणार?

point

गुंतवणूकदारांनी मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करावी की नाही?

Operation Sindoor Impact On Share Market : जेव्हापासून सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे, भारतीय शेअर बाजारावर (Stock Market) त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या संघर्षामुळे मंगळवारी भारतीय बाजारात मोठी घसरण झाली. भारत काय पावले उचलणार, ही भीती गुंतवणूकदारांना सतावत होती. दोन्ही देशात युद्ध होणार का? असा प्रश्नही त्यांना पडला होता. कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी युद्ध सर्वात मोठं आव्हान असतं. त्यामुळे प्रत्येक छोटा-मोठा देश नेहमीच युद्धाला टाळण्याचा प्रयत्न करतो.

हे वाचलं का?

परंतु, मंगळवारी उशिरा रात्री भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या 9 दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्यानंतर वाटत होतं की, बुधवारी शेअर बाजारावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. परंतु, असं काही झालं नाही. मार्केट दबावाखाली उघडलं. परंतु, हळूहळू बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि सेन्सेक्स-निफ्टीत वाढ होऊन ते बंद झाले. सेन्सेक्सच्या शेवटी 105 अंक वाढून 24414 वर बंद झाले. म्हणजेच आता भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम मार्केटवर होत नाहीय.

हे ही वाचा >> टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केली सर्वात मोठी घोषणा, Instagram वरूनच...

घाईघाईत निर्णय घेऊ नका

मार्केटच्या परिस्थितीनुसार, गुंतवणूकदार अजूनही घाबरलेले आहेत. अशातच कोटक म्युच्युअल फंडाचं म्हणणं आहे की, गुंतवणूकदारांना आता घाबरायची गरज नाही. फर्मचं म्हणणं आहे की, गुंतवणूकदारांनी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. पहिल्या गुंतवणुकीत टीकून राहा. अशाप्रकारचा सल्ला कोटक म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांना दिला आहे. 

नवीन SIP गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी

कोटक एमएफच्या माहितीनुसार, ही ती वेळ आहे, जेव्हा गुंतवणूकदार एसआयपी वाढवण्यासाठी विचार करू शकतात. जर कोणाला म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर त्यांना विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागेल. म्युच्युअल फंड हाऊसने म्हटलंय, आम्ही 2016 (उरी आणि बालाकोट) नंतर दोन असे सर्जिकल स्ट्राईक पाहिले आहेत, ज्याचा मार्केटवर मोठा परिणाम झाला नाही.

हे ही वाचा >> Operation Sindoor: कसाबने जिथे माणसं मारण्याचं प्रशिक्षण घेतलेलं तेच भारताने उडवलं, Video Viral

सरकारने दिले संकेत..युद्धासारखी परिस्थिती नाही

कोटक म्युच्युअल फंडाचं म्हणणं आहे की, सरकारच्या कारवाईनुसार स्पष्ट होतं की, युद्धाची शक्यता कमी आहे. पूर्ण युद्धाबाबत आपणं काळजी घेतली पाहिजे की, 1950 पासून भारताने 4 मोठे युद्ध पाहिले आहेत. मागील मोठा संघर्ष (कारगिल-1999) मध्ये सुरुवातीच्या भयावह परिस्थितीनंतर इक्विटी मार्केट मजबूत झालं.

    follow whatsapp