कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी X वर पोस्ट केलं की, परदेशी गुंतवणूकदार विक्री करत आहेत तर भारतीय खरेदी करत आहेत. आतापर्यंत असे दिसते की, FII (परदेशी गुंतवणूकदार) हुशार आहेत. गेल्या वर्षभरात शेअर बाजाराचा डॉलर परतावा शून्य राहिला आहे. पैसा-पाणीच्या विशेष सदरात चर्चा करूया शेअर बाजाराबद्दल.
ADVERTISEMENT
उदय कोटक परदेशी गुंतवणूकदारांना हुशार म्हणत आहेत. कारण, त्यांनी या वर्षी आतापर्यंत ₹2 लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स विकले आहेत, तर भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड SIP द्वारे जवळजवळ ₹3 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. भारतीय शेअर बाजार 5% पर्यंत परतावा देत आहे, परंतु रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचे परतावे शून्य किंवा नकारात्मक झाले आहेत. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार शेअर्स विकतात तेव्हा त्यांना ते काढून घेण्यासाठी रुपयांच्या बदल्यात डॉलर खरेदी करावे लागतात. यामुळे शून्य परतावा मिळत आहे.
SIP द्वारे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार देखील चिंताग्रस्त आहेत, विशेषतः ज्यांनी एक वर्षापूर्वी गुंतवणूक सुरू केली आहे. लार्ज-कॅप स्कीम 5% पर्यंत परतावा देत आहेत, तर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्कीम निगेटिव्ह रिटर्न आहेत. दोन किंवा तीन वर्षांपूर्वी SIP सुरू करणारे अजूनही नफा कमावत आहेत.
तरीही, प्रश्न कायम आहे की, शेअर बाजारात तेजी का नाही?
सर्वात मोठे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी सुरू केलेली विक्री. भारतीय शेअर्स अजूनही परदेशी गुंतवणूकदारांना महाग वाटत आहेत. Nifty चा PE Ratio 22 च्या आसपास आहे, म्हणजे सध्याच्या नफ्यावर आधारित तुम्ही खरेदी करत असलेल्या शेअरचे मूल्य वसूल करण्यासाठी 22 वर्षे लागतील.
परदेशी गुंतवणूकदार भारतात कमी परतावा मिळवत आहेत, तर अमेरिकेच्या बाजारपेठेत 15-20% परतावा मिळवत आहे. भारताबाहेरील इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये ( Emerging Markets) परतावा 5-10% आहे. रुपयाच्या घसरणीमुळे परतावा आणखी कमी झाला आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार अडकला आहे. परदेशी गुंतवणूकदारही त्याची वाट पाहत आहेत. मुख्य आर्थिक सल्लागारांनी पूर्वी सांगितले होते की, नोव्हेंबरपर्यंत करार होऊ शकतो, परंतु आता ते मार्चपर्यंत होईल असं बोलत आहेत. बाजारातील चढउतार कायम राहू शकतात, म्हणून जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला धीर धरावा लागेल. हा एक दीर्घकालीन खेळ आहे.
ADVERTISEMENT











