दोन लोकल जवळून क्रॉस झाल्या आणि... CSMT-कर्जत लोकलमध्ये काय घडलं, रेल्वेने सविस्तर सांगितलं

मुंबई तक

09 Jun 2025 (अपडेटेड: 09 Jun 2025, 11:29 AM)

मध्य रेल्वेचे PRO स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघाताची माहिती दिली. "लोकलच्या दारात उभे राहून काहीजण प्रवास करत होते. त्यावेळी...

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईत मोठा अपघात, रेल्वेतून पडून प्रवासी दगावले

point

CSMT कडून कर्जतला निघालेल्या लोकलमध्ये काय घडलं?

point

मध्य रेल्वेने पत्रकार परिषद घेत दिली माहिती

Mumbai Train Accident : मुंबईत आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. कामाला निघालेल्या प्रवाशांच्या गर्दीने भरलेल्या लोकल मुंबईसाठी नव्या नाही. मात्र, मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान रेल्वेमधून काही प्रवासी पडल्याची दुर्देवी घटना घडली. ही घटना सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. तर हा सगळा प्रकार कसा घडला यावर हे आता रेल्वेने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

हे वाचलं का?

1. घटना किती वाजता घडली? 

सुमारे 9:30 वाजता...

2. लोकल कोणती होती? 

CSMT ते कसारा लोकल 

3. घटना कशी घडली? 

दोन लोक क्रॉस झाल्या आणि दारात उभे प्रवासी पडले. 

4. किती प्रवासी पडले? 

आठ प्रवासी पडल्याची रेल्वेची अधिकृत माहिती.

5. किती प्रवाशांचा मृत्यू? 

वेगवेगळ्या माध्यमांवर आलेल्या माहितीनुसार 6 प्रवासी दगावल्याची माहिती. अधिकृत आकडा समोर नाही.

मध्य रेल्वेने पत्रकार परिषदेत काय म्हटलं? 

मध्य रेल्वेचे PRO स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघाताची माहिती दिली. "लोकलच्या दारात उभे राहून काहीजण प्रवास करत होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरुन कसाराकडे जाणाऱ्या लोकलमधून लोक प़डले. दोन लोकल जवळून क्रॉस झाल्यानं काहीजण खाली पडले होते. यापैकी एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार दारात झालेल्या गर्दीमुळे ते पडले. नव्या सगळ्या गाड्या दार लागण्याच्या सुविधेसोबत असणार आहेत. या घटनेत 8 जण खाली पडल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. मात्र, कितीजणांचा मृत्यू झाला याची माहिती देण्यात आलेली नाही.