Mumbai News: मॅट्रिमोनिअल साईटच्या माध्यमातून महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढायचं आणि नंतर तिच्याकडून लाखो रुपये लुबाडल्याच्या बऱ्याच घटना घडत असतात. मुंबईतील महिलेसोबत सुद्धा असंच घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित तरुणाने विवाह संकेतस्थळावरून पीडितेला लग्नाच्या जाळ्यात ओढलं आणि कुठेतरी मंदिरात लग्न करून नंतर पीडितेकडून वेगवेगळी कारणं सांगून पैसे उकळल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. भोईवाडा पोलिसांनी प्रकरणातील आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
विवाह संकेतस्थळावर झाली भेट
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील पीडित महिला मध्य प्रदेशची रहिवासी असून मुंबईत रेल्वेत टेक्निशियन म्हणून काम करते. ही महिला घटस्फोटित असून तिने विवाह संकेतस्थळावर तिचं नाव नोंदवलं होतं. दरम्यान, 2023 मध्ये तिला धीरेंद्रकुमार नावाच्या व्यक्तीने साइटवर रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर दोघांचीही भेट झाली. त्यावेळी आरोपीने सुद्धा तो केंद्रीय दिल्ली विद्यालयात शिक्षक असल्याची खोटी ओळख सांगितली.
त्या भेटीत आरोपी तरुणाने पीडितेला लग्नाची मागणी घातली आणि महिलेने देखील लग्नासाठी होकार दिला. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हरिद्वार मधील एका छोट्या मंदिरात दोघांचं लग्न झालं.
हे ही वाचा: कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीला नेलं घरी, नंतर केलं लैंगिक शोषण, जर कोणाला सांगितलं तर....दिली धमकी
वेगवेगळी कारणं सांगून लाखो रुपये उकळले
लग्नानंतर महिला मुंबईत परतली. मात्र, आरोपी तरुण तिला वेगवेगळी कारणं सांगून तिच्याकडून पैसे उकळायचा. त्याने पीडितेकडून 14 लाख रुपये घेतले. इतकेच नव्हे तर महिलेच्या वडिलांकडून 4 लाख, तिच्या भावाकडून 2.5 लाख, असे एकूण 20 लाख 50 हजार रुपये घेतले. याच काळात 13 फेब्रुवारी 2024 रोजी या जोडप्याला एक मुलगा झाला. यानंतर सुद्धा आरोपी पीडितेकडून पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास तो तिला शिवीगाळ आणि मारहाणही करायचा. याच त्रासाला कंटाळून ती माहेरी निघून गेली.
हे ही वाचा: भयंकर! नातेवाईकांनीच विधवा महिलेची 'एवढ्या' लाखांना केली विक्री, मुलंही होती बेपत्ता
नवरा गुन्हेगार असल्याचं कळताच मोठा धक्का...
दरम्यान, धीरेंद्रकुमार आणि पीडितेचं बोलणं कमी होत गेलं. एके दिवशी तिने तिच्या सासऱ्यांना फोन केला असता तिला तिचा पती गुन्ह्याच्या आरोपाखील तुरुंगात असल्याचं कळालं. यावर्षीच मार्च महिन्यात आरोपीची आणखी दोन लग्न झाली असून त्यांना 6 वर्षांचा मुलगा असल्याचं शेजाऱ्यांकडून पीडितेला कळालं. या सगळ्याची महिलेला कल्पनाच नव्हती. अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याचं समजताच तिने पोलिसात धाव घेतली आणि आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी धीरेंद्रकुमार गौतमविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
