Mumbai Crime: मुंबईतून चोरीचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका 93 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे हिरे आणि दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. पीडित वृद्ध महिलेच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने म्हणजेच मोलकरणीने ही चोरी केल्याचं वृत्त आहे. मुंबई पोलिसांनी आपल्याच मालकिणीच्या घरात चोरी करणाऱ्या कामवाल्या बाईला केल्याची माहिती आहे. संबंधित घटना मरीन ड्राइव्ह परिसरातील भारती भवन येथे घडली, वृद्ध महिला घरात एकटीच राहत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
पीडितेच्या मुलाने नोंदवली तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोलकरणीचं नाव अर्चना साळवी असून ती कल्याण येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वृद्ध महिलेच्या घरी आरोपी महिला काही काळापासून घरकाम करत होती. संबंधित वृद्ध महिलेचा मुलगा दुबईमध्ये कामाला असून तो त्याच्या आईला भेटण्यासाठी मुंबईत आला आणि त्यावेळीच त्याच्या घरातील चोरीची घटना उघडकीस आली. घरातील कोट्यवधी रुपयांचे दागिने गायब असल्याचं आढळल्यानंतर, तरुणाला चोरी झाल्याचा संशय आला आणि त्यानंतर त्याने पोली स्टेशनमध्ये जाऊन यासंबंधी तक्रार दाखल केली.
आरोपीच्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार
पीडितेच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी अर्चना साळवीचा तपास करण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, आरोपी महिलेच्या बँक खात्यात लाखो रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळून आले. तिचं उत्पन्न आणि जीवनशैली पाहता हे आर्थिक व्यवहार पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यानंतर, तिला ताब्यात घेऊन आरोपी मोलकरणीची चौकशी करण्यात आली.
हे ही वाचा: नाशिक : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने बुटाच्या लेसने गळा आवळला; जागेवर संपवलं
पोलिसांचा तपास
पोलिसांच्या कठोर चौकशीदरम्यान, आरोपी अर्चनाने तिच्या मालकिणीच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. तिच्या जबाबाच्या आधारे, पोलिसांनी जवळपास 1.26 कोटी रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू जप्त ताब्यात घेतल्या. मात्र, अद्याप चोरी झालेल्या अर्ध्याहून अधिक किमतीचे दागिने सापडलेले नसून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: नंदुरबार: डोळ्यात अंजन घालणारं वास्तव! बाण, बांबू आणि ब्लेडने करतात प्रसूती… हो हे घडतंय तुमच्या-आमच्या महाराष्ट्रात!
पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अर्चनाने एकटीनेच तिच्या मालकिणीच्या घरात चोरी करण्याची योजना आखली. पोलिसांनी आरोपी मोलकरणीविरुद्ध कठोर गुन्हेगारी कलमांखाली गुन्हा दाखल केला असून यासंबंधी पुढील कारवाई केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT











