मुंबईत मुसळधार पाऊस, पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट जारी

मुंबई तक

• 09:04 AM • 04 Jul 2026

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने आज (4 जुलै) सकाळी अपडेट जारी केले आहे.

Western Railway Update

Western Railway Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईत मुसळधार पाऊस

point

पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट जारी

Western Railway Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने आज (4 जुलै) सकाळी अपडेट जारी केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आज दिवसभर शहर आणि उपनगरीय भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईत सामान्यतः ढगाळ आकाश राहील. शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, मुंबईतील काही वेगवेगळ्या भागांत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे ही वाचा : 'नवऱ्याला मारेल त्याला एक लाख देईन..' बायकोचं चॅलेंज अन् घडलं भयंकर!

पश्चिम रेल्वेनं काय सांगितलं?

सतत सुरू असलेल्या पावसानंतरही पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा मात्र सध्या सुरळीत सुरू आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेअंतर्गत चर्चगेट ते डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल गाड्या आपल्या नियमित वेळेनुसार धावत आहेत. तसेच हार्बर मार्गावरील माहिम ते गोरेगाव दरम्यानची वाहतूकही पूर्णपणे सामान्य असून प्रवाशांना कोणताही मोठा अडथळा आलेला नाही.

हे ही वाचा : वाशिम : 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

प्रवाशांना आवाहन 

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ (मुख्य जनसंपर्क अधिकारी) विनीत अभिषेक यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, पावसाच्या वातावरणात घराबाहेर पडताना प्रत्येकाने सोबत छत्री किंवा रेनकोट अवश्य ठेवावा. तसेच रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवून राहावे. यासोबतच, जलमय किंवा पाणी साचलेल्या भागांत विशेष काळजी घेण्याचा आणि गरज नसताना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही प्रवाशांना देण्यात आला आहे.