मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला भीषण आग, Video व्हायरल

मुंबई तक

15 Jul 2026 (अपडेटेड: 15 Jul 2026, 01:11 PM)

Mumbai Coastal Road Car Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर बोगद्याच्या सुरूवातीलाच आग लागल्याची माहिती समोर आली. एका धावत्या चार चाकी वाहनाला आग लागली आहे. गाडीने पेट घेतल्याने धुराचे लोट पसरले आहेत. आग लागल्याने वाहतूक बंद पडलेली असल्याची माहिती समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mumbai Coastal Road Fire

Mumbai Coastal Road Fire

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कोस्टल रोडवर बोगद्याच्या सुरूवातीलाच कारला आग

point

व्हिडिओ व्हायरल 

Mumbai Coastal Road Car Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर बोगद्याच्या सुरूवातीलाच आग लागल्याची माहिती समोर आली. एका धावत्या चार चाकी वाहनाला आग लागली आहे. गाडीने पेट घेतल्याने धुराचे लोट पसरले आहेत. आग लागल्याने वाहतूक बंद पडलेली असल्याची माहिती समोर आली. बचावकार्य घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. या दुर्दैवी घटनेची माहिती 15 जुलै 2026 रोजी सकाळी घडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शरद पवार घड्याळ आतल्या बाजूने का घालतात? अंकशास्रज्ञाने सांगितलं लॉजिक

नरीमन पॉईंट येथून येणारी वाहतूक बंद असल्याचे सांगण्यात येते. बोगद्यातून येणारी वाहने तशीच अडकून पडलेली आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे. यामुळे घटनास्थळावरील प्रवास हा ठप्प पडला आहे. धुराच्या लोटामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. 

व्हिडिओ व्हायरल 

अशातच एका अडकलेल्या वाहनातील प्रवाशाने आमची सुखरूपपणे सुटका करावी असं सांगितलं. लोक गाड्या सोडून पळत आहेत. कृपया पोलिसांनी येण्याची कृपा करावी. आतमध्ये कोस्टल रोड जाम झाल्याचं एका प्रवाशाने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. 

हे ही वाचा : Astrology : श्रावण महिन्यात मोठं परिवर्तन, काही राशींचं भाग्य उजळणार

कारने भीषण पेट घेतल्याने पुढे कोणतीच गाडी आली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बोगद्यात अधिक गाड्या अडकल्याने अग्निशमन दलाच्या गाडीला आत प्रवेश करण्यासाठी विलंब निर्माण झाला होता. अशातच आता अग्निशमन दल आग विझवण्याचे काम करत आहे.