नालासोपाऱ्यात आईने 15 वर्षाच्या मुलीची दगडी जात्याने डोकं ठेचून केली हत्या, खूनाचं कारण आलं समोर

Mumbai Crime : नालासोपारा येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईनेच आपल्या लेकीला बेदम मारहाण करत डोक्यात दगडी जातं घालून तिची हत्या केली. मृत मुलीचं वय वर्षे 15 होते. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. ही घटना नालासोपाऱ्यातील टांडा पाडा परिसरात घडल्याचं वृत्त आहे.

Mumbai Crime

Mumbai Crime

मुंबई तक

25 Jan 2026 (अपडेटेड: 25 Jan 2026, 08:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईने मुलीच्या डोक्यात दगडी जात्याने हल्ला करत संपवलं 

point

हत्येमागेचं कारण आलं समोर

Mumbai Crime : नालासोपारा येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईनेच आपल्या लेकीला बेदम मारहाण करत डोक्यात दगडी जातं घालून तिची हत्या केली. मृत मुलीचं वय वर्षे 15 होते. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. ही घटना नालासोपाऱ्यातील टांडा पाडा परिसरात घडल्याचं वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत मुलीचं नाव अंबिका प्रजापती असे होते, तर हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव कुमकुम असे आहे. 

हे वाचलं का?

आईने मुलीच्या डोक्यात दगडी जात्याने हल्ला करत संपवलं 

घडलेल्या घटनेनुसार, अंबिका ही लहान भावंडांना अनेकदा मारहाण करायची. याच रागातून कुमकुम प्रजापतीने मुलीच्या डोक्यात जात्याने हल्ला करत डोकं ठेचत खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता घडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपी आईला ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईनेच मुलीचं डोकं दगडाने ठेचलं आहे. घटनास्थळी एक पथक पोहोचले असता, त्याच ठिकाणी मुलीच्या मृतदेहासह आई उपस्थित होती. नंतर मृतदेह शवविच्छेदनासठी पाठवला. आरोपी कुमकुमच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

हत्येमागेचं कारण आलं समोर

पोलिसांनी सांगितलं की, हत्या करण्यात आलेली मुलगी ही पाचही भावंडांमध्ये थोरली होती. मुलीनं आपल्या लहान भावंडांना त्रास दिला, तसेच मारहाण केली होती. याच रागातून आईने आपल्याच मुलाच्या डोक्यात दगडी जात्याने हल्ला करत मुलीला संपवलं, या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

    follow whatsapp