मुंबईकरांच्या जीवाशी खेळ! उंदीर मारण्याचं औषध शिंपडून फळांची विक्री; मालाडमधील संतापजनक प्रकार उघड; दोघांना अटक

Mumbai Crime News : मालाड परिसरात फळ विक्रेते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक कुणाल साळुंखे यांनी पोलिसांकडे केली होती. दोन फळ विक्रेते फळांवर उंदीर मारण्याचे जहाल विषारी औषध लावत होते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Mumbai Crime News

Mumbai Crime News

मुंबई तक

25 Feb 2026 (अपडेटेड: 25 Feb 2026, 02:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईकरांच्या जीवाशी खेळ! उंदीर मारण्याचं औषध शिंपडून फळांची विक्री;

point

मालाडमधील संतापजनक प्रकार उघड; दोघांना अटक

मुंबई (मालाड): आपण आरोग्य चांगले राहावे म्हणून बाजारातून ताजी फळे विकत घेतो, पण तीच फळे जर तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार असतील तर? मुंबईच्या मालाड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या फळांवर चक्क उंदीर मारण्याचे विषारी औषध शिंपडल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय आहे?

मालाड परिसरात फळ विक्रेते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक कुणाल साळुंखे यांनी पोलिसांकडे केली होती. दोन फळ विक्रेते फळांवर उंदीर मारण्याचे जहाल विषारी औषध लावत होते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रार मिळताच मालाड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि संबंधित फळविक्रेत्यांच्या दुकानावर धाड टाकली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी हे दुकान सील केले असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : घरात घुसून 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, घाबरुन मुलगी गप्प बसली; यानंतर घडलं भयकंर

फळ विक्रेत्यांवर पोलीसांची कारवाई 

मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी या घटनेच्या गांभीर्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, "नागरिकांच्या तक्रारीनंतर आम्ही तातडीने कारवाई केली आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 125, 274, 275 आणि 286 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे हा गंभीर गुन्हा असून पुढील तपास सुरू आहे."

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

या घटनेमुळे 'बाहेरून फळे आणताना ती किती सुरक्षित आहेत?' असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाजारातून आणलेली फळे किमान 15-20 मिनिटे कोमट पाण्यात धुवावीत. फळांचा रंग किंवा वास संशयास्पद वाटल्यास ती खाऊ नयेत. रस्त्यावरील कोणत्याही विक्रेत्याकडून फळे घेताना स्वच्छतेची खात्री करावी. असा कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. हेल्दी राहण्याच्या नादात आपण आपल्या कुटुंबाला विष तर वाढत नाही ना? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. मालाडमधील या घटनेने अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर भाजपची बैठक, राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी? विनोद तावडे अन् आठवलेंबाबत मोठा निर्णय?
 

    follow whatsapp