Mumbai Crime : मुंबईतील सांताक्रूझमध्ये मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदू बाबाने 32 वर्षीय पीडित महिलेला त्रासातून मुक्त करतो असे सांगितले आणि तिच्यावर बलात्कार केला. संबंधित प्रकरणात आरोपी भोंदू बाबा अब्दुल रशीद (वय 45) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : फिरायला जाण्याचं महिलेला दाखवलं आमिष, बॉयफ्रेंडने धारदार शस्त्राने केले सात तुकडे, अन् वेगवेगळ्या विहिरीत...
भूतबाधा झाल्याचं सांगत उपचाराच्या नावाने केला बलात्कार
पीडित महिला ही गेल्या काही काळापासून शारीरिकदृष्ट्या कमजोर होती. याचा फायदा घेत भोंदू बाबा अब्दुल राशीद पीडितेशी अधिक संपर्क साधत राहिला. तुझ्यावर भूतबाधा झाल्याचं भोंदू बाबाने सांगितले. तांत्रिक विधी करून भूतबाधा दूर करता येईल, असा भोंदू बाबाने सांगितले. त्यानंतर तिला उपचारासाठी एका ठिकाणी बोलावले.
संबंधित ठिकाणी बोलावून आरोपी भोंदू बाबा रशीदने तिच्यावर बलात्कार केला. हा एक उपचाराचाच भाग असल्याचा पीडित महिलेचा गैरसमज झाला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं असता, पीडितेनं मंगळवारी सांताक्रूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल
त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी भारतीय संहितेच्या कलम (64) व (64) 2 अंतर्गत अंधश्रद्धा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर बुधवारी राशीदवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. अशा भोंदू बाबांसारख्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.
हे ही वाचा : मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात
पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदू बाबांना आणि अंद्धश्रद्धेला कधीही बळी न पाडण्याचे आवाहन केलं आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सांताक्रुझ पोलीस करत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं सांताक्रुझमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
