मीरा-भाईंदर: ऑनलाइन गेमचं लागलं वेड, पोरानं 'त्यासाठी' घेतला आईचाच जीव

Mumbai Crime : वसईत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका तरुणाने आपल्या आईची हत्या केली आहे. कारण ऐकून तुमचाही थरकाप उडेल.

Mumbai Crime Young man kills mother for not paying for online game vasai incidence

Mumbai Crime Young man kills mother for not paying for online game vasai incidence

मुंबई तक

29 Jul 2025 (अपडेटेड: 30 Jul 2025, 08:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वसईत धक्कादायक प्रकरण उघडकीस

point

मुलाने आईलाच संपवलं

point

कारण ऐकून चक्रावून जाल

Mumbai Crime : वसईत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत डी-मार्टच्या परिसरात एका तरुणाने ऑनलाईन गेमसाठी आपल्या सावत्र आईकडे पैसे मागितले होते. तेव्हा आईने पैसे न दिल्याच्या वादातून तरुणाने सावत्र आईची हत्या केली आहे. संबंधित प्रकरणाची माहिती वडिलांना समजताच काही नातेवाईकांनी आईचा मृतदेह हा जमिनीत पुरल्याचं समजतंय. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी मुलाची चौकशी केली असता, त्याने हत्येचा कबुलीनामा दिला आहे. या प्रकरणातील मृत्यू प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एका डॉक्टरांना दोषी ग्राह्य धरलं गेलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 18 वर्षानंतर दरिद्र योग 'या' राशीतील लोकांना मिळणार आर्थिक पाठबळ, काही राशीतील लोकांचा खिसा रिकामाच राहणार

मृत महिला अर्शिया खुसरू (61 वय), पती मोहम्मद खुसरू (65 वय) सावत्र मुलगा इम्राम (32 वय) यांच्यासोबत पेरियार अपार्टमेंटमध्ये राहत होती. 26 जुलै रोजी महिलेची इम्रानने हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेहा स्मशानभूमीत पुरण्यात आला होता. मात्र, महिलेच्या भावांना संबंधित प्रकरणाचा संशय बळावला गेल्याने ही घटना उघडकीस आली.

नेमकं काय घडलं? 

महिलेच्या भावाने तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर त्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यास सुरूवात केली. तेव्हा इम्रानला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी केली असता त्यानं सांगितलं की, 1.80 लाख रुपयांची आईकडे मागणी केली होती. तेव्हा अर्शियाने पैसे देण्यास नकरा दिला. यामुळे संतापलेल्या इम्रानने तिचे डोके भिंतीवर आपटले आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. 

त्याने कपाटातून सोन्याचे दागिने काढले आणि त्यांच्या वडिलांना हत्येची माहिती दिली. तेव्हा त्या ठिकाणी रक्ताचे डाग पडले होते. जिथं जिथं रक्ताचे डाग होते ते साफ केले. त्यानंतर, त्यांनी एका डॉक्टरांच्या मदतीने बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवले. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणासह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात बरसणार जोरदार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ निरीक्षक समीर अहिरराव यांच्या नेतृत्वाखालील एक पथर महिलेच्या घरी पोहोचले होते. तेव्हा संबंधित प्रकऱणाची चौकशी करण्यात आली. कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांची चौकशी केला असता त्याने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. 


    follow whatsapp