मुंबईतील मालवणी परिसरात सिलिंडर ब्लास्ट, चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी

Mumbai Gas Sylinder Blast : मुंबईतील मालवणी परिसरात हादरवून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मालवणी गेट क्रमांक 8 जवळ भारतमाता शाळेजवळील एसी मशि‍दीनजीकच्या चाळीत 27 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत चाळीला आग लागली आहे. 

Mumbai Gas Sylinder Blast

Mumbai Gas Sylinder Blast

मुंबई तक

27 Jan 2026 (अपडेटेड: 27 Jan 2026, 01:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मालवणी परिसरात हादरवून टाकणारा प्रकार

point

गॅस सिलिंडरचा स्फोट

point

सिलिंडर स्फोटात सात जण गंभीर जखमी

Mumbai Gas Sylinder Blast : मुंबईतील मालवणी परिसरात हादरवून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मालवणी गेट क्रमांक 8 जवळ भारतमाता शाळेजवळील एसी मशि‍दीनजीकच्या चाळीत 27 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत चाळीला आग लागली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सरस्वतीच्या मूर्ती विसर्जनानंतर 15 वर्षीय मुलाने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडली, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल

सकाळी 9:25 वाजता बीएमसी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दल, पोलीस, तसेच संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी रुग्णवाहिका आणि बीएमसी वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावून आले होते. 

पहिल्या मजल्यावर काही प्रमाणात आग होती, ज्यात सिलिंडरचा मुख्य व्हॉल्व्ह, गॅस स्टोव्ह, एलपीजी सिलिंडर, एस शीट, घरगुती वस्तू, अन्नपदाऱ्त आणि गाद्या देखील होत्या. अग्निळशमन दलाने सकाळी 9:42 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. 

हे ही वाचा : आईनेच तान्हुल्या बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं, भटक्या जनावरांनी लचके तोडले; डॉक्टरांकडे नेईपर्यंत जीव गेला

सिलिंडर स्फोटात सात जण गंभीर जखमी

या घटनेत एकूण सात जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमीपैकी चार जणांना आधार रुग्णालयात आणि तिघांना केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.  काहींची प्रकृती ही गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. सर्वांवर सध्या तपास सुरु असल्याचं बोललं जातंय. 

    follow whatsapp