Mumbai gateway of india incident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ गुरुवारी रात्री समुद्रात बोट अचानक बिघडली. इंजिन अचानक बंद पडल्याने 34 प्रवाशांसह चार चालक दलाच्या लोकांचा जीव टांगणीला लागला होता. गुरुवारी रात्री सुमारे 8.30 वाजता ही घटना घडली. ‘अनवारी’ नावाची बोट समुद्री सफरीसाठी प्रवाशांना घेऊन गेली होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Center Point | विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?
समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 1.5 नॉटिकल माइल अंतरावर इंजिन अचानक खराब
सुमारे अर्ध्या तासाची समुद्री सफर पूर्ण करून गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने परतत असताना समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 1.5 नॉटिकल माइल अंतरावर इंजिन अचानक खराब झाले. या बोटमध्ये एकूण 38 जण होते. त्यात 34 प्रवासी आणि चार चालक दलाचे सदस्य होते. इंजिन बंद पडल्याने फेरी समुद्रातच अडकली आणि मदत मिळेपर्यंत प्रवाशांची धाकधूक वाढली.
हेही वाचा : रत्नागिरीहून आलेल्या बापटांनी पुणेकरांना शिकवू नये, ठोंबरेंची पोस्ट, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
‘आजाद हिंद’ बोट रवाना झाली, अन् 38 जणांचा जीव वाचला
पोलिस कंट्रोल रूमला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कॉन्स्टेबल अभिजीत शिंदे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी परिसरात असलेल्या बोटीची माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी खराब झालेल्या फेरीच्या जवळच ‘आजाद हिंद’ नावाची आणखी एक समुद्री सफर करणारी बोट असल्याचे पोलिसांना समजले. पोलिस अधिकाऱ्यांनी या बोटीचे मालक जुनैद मुल्ला यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यानंतर ‘आजाद हिंद’ बोट खराब झालेल्या ‘अनवारी’ फेरीच्या दिशेने रवाना झाली.
‘आजाद हिंद’ बोट घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिने ‘अनवारी’ फेरीला ओढून गेटवे ऑफ इंडियाच्या जेट्टी क्रमांक 2 पर्यंत आणले. रात्री सुमारे 9.30 वाजता फेरीला सुरक्षितपणे जेट्टीवर आणण्यात आले. त्यानंतर फेरीतील सर्व 34 प्रवासी आणि चारही चालक दलाचे सदस्य कोणतीही दुखापत न होता सुखरूप किनाऱ्यावर उतरले. मदत मिळाल्यानंतर आणि सर्व जण सुरक्षितपणे तटावर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT












