मुंबई लोकलमध्ये मर्डर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उचललं

Mumbai Local Murder : लोकल ट्रेन हा मुंबईचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. याच लोकल ट्रेनमधून दररोज असंख्य प्रवासी प्रवास करत असतात. महिलांपासून ते अगदी पुरूषांची हाणामारी होते, त्याचे तुम्ही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत, असाच एक धक्कादायक प्रकार मुंबई लोकल ट्रेनमध्ये घडला.

Mumbai Local Murder

Mumbai Local Murder

मुंबई तक

24 Jun 2026 (अपडेटेड: 24 Jun 2026, 06:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकलमध्ये प्रवाशाशी दरवाजा बंद करण्यावरून वाद

point

आरोपीची ओळख समोर 

Mumbai Local Murder : लोकल ट्रेन हा मुंबईचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. याच लोकल ट्रेनमधून दररोज असंख्य प्रवासी प्रवास करत असतात.  महिलांपासून ते अगदी पुरूषांची हाणामारी होते, त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईच्या लोकल रेल्वेत घडला. एका तरुणाने मयंक लोहार (वय 22) नावाच्या तरुणावर चाकूने सपासप वार करत संपवलं, या घटनेनं रेल्वेतील नागरिक हादरून गेले. अशातच आरोपीची ओळख रोशन सुवर्णा (वय 30) पटली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गेस्ट हाऊसमध्ये एक महिला आणि 6 पुरूष, 'नको तसलं' रॅकेट अन्..

लोकलमध्ये प्रवाशाशी दरवाजा बंद करण्यावरून वाद

लोकलमध्ये प्रवाशाशी दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता. याच वादातून रोशन सुवर्णाने मयंकवर चाकूने सपासप वार केले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री 11 वाजता जोगेश्वरी ते मालाड स्थानकादरम्यान घडला होता. दरम्यान, मृत मयंक हा विरारचा राहणारा आहे. अशातच आरोपीच्या कुर्ला स्थानकावरून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.  

आरोपीची ओळख पटली

आरोपीच्या वडिलांची कसून चौकशी केल्यानंतर रोशनचं लोकेशन समोर आले. आरोपी रोशन हा मुंबई एयरपोर्टमध्ये कार्गो सेक्शनमध्ये काम करतो. खून केल्यानंतर आरोपी सुवर्णा हा पावलं मोजत बोरिवली स्थानकावर रेल्वेतून उतरला. प्रवाशांनी मयंकला वाचवण्याऐवजी कोणीच मध्यस्ती केली नाही. दरम्यान आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सात तुकड्या रवाना केल्या होत्या. सीसीटीव्ही माध्यमातून आरोपीचा माग काढत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : मुंबई : लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, दरवाजा बंद करण्यावरुन वाद अन् भयानक घडलं!

मृत मयंकची सहावी पिढी मुंबईतील रहिवासी 

मृत तरुण मयंक लोहार याने फायनान्स मार्केटिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं. गेल्या 9 महिन्यांपासून तो चाकाला येथे नोकरीस जात होता. दररोज विरार ते अंधेरी असा त्याचा प्रवास असायचा. लोहार हा मुख्य नेपाळचा होता, मात्र त्याचे कुटुंब मुंबईतील सहावी पिढी असल्याची माहिती समोर आली. मयंक हा अंधेरीत राहत होता, मात्र त्यांचं घर पुनर्विकासासाठी गेल्यानं त्याचे कुटुंब विरार येथे राहत होते.