Mankhurd House Collapes : मुंबईच्या मानखुर्द परिसरात मन सून्न करून टाकणारी घटना घडली आहे. मानखुर्द परिसरात चाळ कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्याची घोषणा केली आहे, या प्रकरणाची ट्विट करत माहिती दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : टिटवाळ्यात घरात शिरलं पाणी, वृद्ध महिलेचा पाणी काढण्यासाठी संघर्ष, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
मृत व्यक्तीच्या वारसांना 5 लाखांची मदत
मानखुर्दमध्ये चाळ दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासाठी प्रत्येकी मृत व्यक्तीच्या वारसदारांना 5 लाखांची मदत करणार असल्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. दरम्यान, सध्या सतत सुरु असलेल्या पावसाने मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा स्थितीत मानखुर्दमध्ये मुसळधार पावसाने तीन मजली चाळ कोसळल्याचे वृत्त समोर आले.
हे ही वाचा : Maharashtra Weather : पुढील काही तास धोक्याचे, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्टचा अंदाज
बचावकार्य सुरू
मानखुर्दच्या तीन मजली चाळ कोसळल्याने सहा जण जागीच ठार झालेत. सरकारकडून त्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाखांची अर्थसहाय्य मदत म्हणून दिली जाणार आहे. या भीषण अपघातात काही जण जखमी असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य काम करताना दिसत आहे. NDRF च्या जवानांसह रात्रीपासून बचावकार्य सुरु असल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT












