टिटवाळ्यात घरात शिरलं पाणी, वृद्ध महिलेचा पाणी काढण्यासाठी संघर्ष, Video व्हायरल

मिथिलेश गुप्ता

06 Jul 2026 (अपडेटेड: 06 Jul 2026, 01:42 PM)

Mumbai Monsoon : ठाणे जिल्ह्याच्या टिटवाळा परिसरात बैठी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. याच परिसरात एक वृद्ध महिला आपल्या घरात शिरलेलं पाणी बाहेर काढताना दिसते, त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Mumbai Monsoon

Mumbai Monsoon

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वृद्ध महिला घरात साचलेलं पाणी बाहेर काढते

point

व्हिडिओ तुफान व्हायरल

Mumbai Monsoon : ठाणे जिल्ह्याच्या टिटवाळा परिसरात बैठी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. नागरिक हतबल झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहेत. चारही बाजूने या नागरिकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. टिटवाळा परिसरातील इंदिरा नगर परिसरातील एक व्हिडिओ समोर आलेला आहे. एक वृद्ध महिला घरात शिरलेलं पाणी बादलीने काढण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra Weather : पुढील काही तास धोक्याचे, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्टचा अंदाज

वृद्ध महिला घरात साचलेलं पाणी बाहेर काढते

व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं की संबंधिक वृद्ध महिला ही पाण्याची बादली घेऊन घरात साचलेलं पाणी बाहेर काढत आहेत. घरात पाणीच पाणी साचलेलं दिसून येत आहे. पाणी काढण्यासाठी वृद्ध महिलेला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत, यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्चचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.

व्हिडिओ तुफान व्हायरल

सलग सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे, यामुळे अनेक अपघात देखील झालेत. यामुळे मुंबईसह उपनगरातील नागरिकांची चांगलीच दाणादाण झाली आहे. आज राज्यभरात सुरु असलेल्या पावसाचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवला आहे, यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.  

हे ही वाचा : पुणे–मुंबई जाणार आहात? आधी ही बातमी वाचा; एक्स्प्रेसवे, जुना महामार्ग बंद.. मुसळधार पावसाचा कहर

अनेक ठिकाणी वाहतूक सेवा तसेच रेल्वे वाहतूक सेवेवर देखील प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. कारण काही ट्रॅकमध्ये पाणी शिरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होताना दिसतो. तसेच काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवान करण्यात आलं.