Govt Jobs : इंजिनीअर्स, 'इथे' होणार थेट भरती, एक लाखाहून अधिक पगार, अर्ज कराच!

मुंबई तक

• 04:31 PM • 05 Jul 2026

NHAI अंतर्गत एका कंपनीत इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. ही भरती कोणत्याही परिक्षेशिवाय म्हणजेच थेट होणार आहे.

Government Jobs

Government Jobs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

इंजिनीअर्स, 'इथे' होणार थेट भरती

point

एक लाखाहून अधिक पगार

point

अर्ज कराच

Government Jobs : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (NHAI) उपक्रम असलेल्या 'इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड' (IHMCL) द्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 'सिस्टम्स इंजिनियर' (ITS) या पदासाठी एकूण 30 जागा भरल्या जाणार असून, थेट भरती (Direct Recruitment) पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात आहे.  या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स, डेटा सायन्स, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांपैकी कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंगची पदवी असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, जे उमेदवार सध्या अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात शिकत आहेत आणि ज्यांचे अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत, ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात; मात्र त्यांनी इतर सर्व आवश्यक पात्रता अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात रस्ता फोडून उसळला पाण्याचा फवारा, Video व्हायरल

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना 'IHMCL' मध्ये आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे. 'सिस्टम्स इंजिनियर' या पदासाठी 'E-2 Grade' अंतर्गत 50,000 ते 1,60,000 रुपये या दराने वेतन निश्चित करण्यात आले आहे. नोकरीच्या सुरुवातीला 50,000 रुपयांच्या मूळ वेतनासह महागाई भत्ता, कॅफेटेरिया भत्ता आणि घरभाडे भत्ता मिळून एकूण अंदाजे 1,00,000 रुपये प्रतिमहिना वेतन मिळेल.

हे ही वाचा :  मुंबईची खबर : मुसळधार पावसाचा आणखी एक बळी, आतापर्यंत किती मुंबईकरांनी गमावले प्राण?

अर्ज करण्याची अंतिम मुदत

या पदांसाठी ऑनलाईन नोंदणीला 4 जुलैपासून सुरुवात झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 2 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा लागेल. अधिकृत जाहिरात, रिक्त जागांचा तपशील आणि अर्ज करण्याची सविस्तर पद्धत यासंबंधीची संपूर्ण माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर (ihmcl.co.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.