NTPC Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये 'असिस्टंट केमिस्ट ट्रेनी' पदासाठी भरती सुरु झाली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह एम.एस्सी. (केमिस्ट्री) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे, तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PWD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण श्रेणी असणे पुरेसे आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना 10 जुलै पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून (ntpc.co.in) ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 10 जुलै रोजी 27 वर्षांपर्यंत असावी. अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, सामान्य (General), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गासाठी 500/- रुपये शुल्क आकारले जाईल, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
हे ही वाचा : Mumbai Monsoon : मुंबईत पावसाची धुव्वादार बॅटिंग, चार दिवसांत तिघांचा दुर्दैवी मृत्यू
भरघोस वेतन मिळणार
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात कोठेही केली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 1,20,000 रुपयांच्या वेतनश्रेणीत समाविष्ट केले जाईल, ज्यामध्ये सुरुवातीचे मूळ वेतन 30,000 रुपये असेल. याशिवाय कंपनीच्या नियमांनुसार महागाई भत्ता, इतर भत्ते, वैद्यकीय सुविधा आणि सेवानिवृत्तीचे लाभ देखील प्रशिक्षण कालावधी दरम्यान आणि त्यानंतर लागू राहतील, ज्यामुळे सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
हे ही वाचा : 'तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका...' अमित साटम फिदीफिदी हसले, राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं
'अशी' होणार निवड
उमेदवारांची निवड प्रक्रिया अखिल भारतीय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या ऑनलाईन निवड चाचणीवर आधारित असेल. या परीक्षेचे दोन भाग असतील - 'विषय ज्ञान चाचणी' (Subject Knowledge Test) आणि 'एक्झिक्युटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट' (Executive Aptitude Test). उमेदवारांना या दोन्ही भागांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
ADVERTISEMENT












