Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, IMD चा अंदाज

मुंबई तक

02 Jul 2026 (अपडेटेड: 02 Jul 2026, 03:50 PM)

Maharashtra Weather : मुंबईसह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही दिवसांपासून राज्यात पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच आता IMD विभागानुसार, 2 जुलै 2026 रोजी रात्री पावसाच्या प्रमाणात वाढ होईल.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचं थैमान

point

पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम

Maharashtra Weather : मुंबईसह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही दिवसांपासून राज्यात पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच आता IMD विभागानुसार, 2 जुलै 2026 रोजी रात्री पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. हा पाऊस 6 जुलैपर्यंत सुरूच राहणार आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये व्यक्ती पडला, वाहून गेल्याची भीती व्यक्त

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचं थैमान

IMD हवामान विभागानुसार, विक्रम सिंह यांनी सांगितलं की, 24 तासादरम्यान मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाने थैमान घातलं. मागील दोन दिवसांपासून मान्सूनजन्य परिस्थिती असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मुंबईतील काही भागांत पाणी साचलं होते, तिकडची परिस्थिती आता नियंत्रणात आली. पावसाचा जोर हा 3 जुलै रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अधिक शक्यता आहे. 

काही भागांत अतिवृष्टी होण्याची अधिकची संभावना आहे. पावसाचा परिणाम हा सर्वदूरवर पसरलेला आहे. तसेच राज्याच्या ठिकठिकाणी त्याचा परिणाम निर्माण होऊ शकतो. ते म्हणाले की,  पुढील दोन ते तीन दिवस सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची संधी आहे. 

हे ही वाचा : सासऱ्याने सुनेला अश्लील व्हिडिओ पाठवले, नंतर पीडितेच्या माहेरी जाऊन धमकावले

पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम

IMD नुसार, 4 जुलैच्या संध्याकाळपासून 6 जुलैपर्यंत पावसाचा जोर कामय राहण्याची शक्यता आहे. या काळात, राज्याच्या विविध भागांमध्ये सलग चार ते पाच दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा काळ आहे. नागरिकांनी पूर्णपणे सतर्क राहावे.