मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

मुंबई तक

Mumbai Manhole News : मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोड परिसरात धक्कादायक घटना घडली. संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते, मात्र त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही दुर्दैवी घटना 2 जुलै 2026 रोजी गुरुवारी घडली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Manhole News
Mumbai Manhole News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

साकीनाका परिसरातील मॅनहोलमध्ये पुरूष पडून मृत्यू

point

मॅनहोल हे 25 ते 30 फूट खोल असल्याची माहिती

Mumbai Manhole News : मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोड परिसरात धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याची दुर्घटना समोर आली, संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते, मात्र त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही दुर्दैवी घटना 2 जुलै 2026 रोजी गुरुवारी घडली आहे. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीची अस्लम इसाक शेख अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : सासऱ्याने सुनेला अश्लील व्हिडिओ पाठवले, नंतर पीडितेच्या माहेरी जाऊन धमकावले

मॅनहोल हे 25 ते 30 फूट खोल

साकीनाका परिसरातील भागात एक उघडा मॅनहोल होता. संबंधित मॅनहोल हे 25 ते 30 फूट खोल होते. व्यक्तीला वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, अस्लम इसाक शेखचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरांतील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झालं आहे. दादर, प्रभादेवी, माटुंगा, सायन, अंधेरी, मुंब्रा, नालासोपारा, कळंबोली या भागांतील सखल ठिकाणी पाणी साचलं होतं. 

हे ही वाचा : "भाजपचं दार बंदच, ज्यांना जायचं त्यांनी..."; देवेंद्र फडणवीसांनी पक्षफुटीवर केलं भाष्य

मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला, मात्र तोवर उशिर झाला होता. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली आहे. स्थानिकांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.