Govt Jobs : पदवीधरांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती, एक लाखाहून अधिक पगार

मुंबई तक

• 04:45 PM • 02 Jul 2026

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै आहे. उमेदवारांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या.

Bank Of India Jobs

Bank Of India Jobs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पदवीधरांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती

point

एक लाखाहून अधिक पगार

Bank Of India Jobs : बँक ऑफ इंडियाने (BOI) विविध ग्रेड अंतर्गत तब्बल 779 क्रेडिट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV या ग्रेडमधील पदांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांकडे बँकिंग किंवा क्रेडिट क्षेत्रातील आवश्यक अनुभव आहे, अशा पदवीधरांसाठी आणि व्यावसायिकांसाठी सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची ही एक मोठी आणि सुवर्णसंधी आहे.

हे वाचलं का?

पगार किती मिळणार?

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह (SC, ST, OBC आणि PWBD उमेदवारांसाठी 55% गुण) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय CA, CMA-ICWA, CS किंवा CFA अशी व्यावसायिक पात्रता असणारे उमेदवारही या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असणेही गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाच्या ग्रेडनुसार 64,820 ते 1,20,940 रुपयांच्या दरम्यान आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे.

हे ही वाचा : मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

अर्जाची शेवटची तारीख काय?

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून पासून सुरू झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांनी बँकेच्या www.bankofindia.bank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

हे ही वाचा : 28 वर्षीय विधवा सुनेने केली सासऱ्याची हत्या, बलात्काराचा प्रयत्न केल्याचा दावा

अर्जाचे शुल्क किती?

अर्जासाठी लागणारे शुल्क प्रवर्गानुसार निश्चित केले असून, General आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये (अर्ज शुल्क + इतर खर्च) शुल्क आकारले जाईल. तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये (इंटिमेशन चार्जेस) शुल्क असणार आहे. शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वीच आपला अर्ज आणि शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.