नवी मुंबईच्या रस्त्यांना नाल्याचं स्वरुप, पावसानं बेदम झोडपलं

मुंबई तक

• 02:21 PM • 30 Jun 2026

Mumbai Monsoon News : राज्यात मान्सूनने धिंगाणा घालण्यास सुरूवात केली आहे. अशातच मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील रहिवाशांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं, रस्ते पाण्याखाली गेले.

Mumbai Monsoon News

Mumbai Monsoon News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सानपाडा ते एपीएमसी परिसरातील रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरुप

point

मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस

Mumbai Monsoon News : राज्यात मान्सूनने धिंगाणा घालण्यास सुरूवात केली आहे. अशातच मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील रहिवाशांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं, रस्ते पाण्याखाली गेले. तुर्भे परिसरात निवासी सोसायट्यांच्या पार्किंग लॉटमध्ये पावसाचे पाणी साचले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शाळेतील विद्यार्थी मित्राला समलैंगिक संबंधासाठी विचारलं, नकार देताच..

सानपाडा ते एपीएमसी परिसरातील रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरुप

या मुसळधार पावसाने सानपाडा ते एपीएमसी परिसरातील रस्त्यावर पाणी साचलं आहे. याच परिसरातील रस्त्यांवर दीड फूट पाणी साचल्याने लोकांना चालणे कठीण होऊन बसले आहे. संबंधित प्रकरणात असे म्हटले जातेय की, नाल्यासी योग्य ती साफसफाई न केल्याने पाण्याचा निचरा लवकर होणं अवघड आहे, अशा स्थितीत रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप आले. याचा लोकांच्या दैनंदिन जीवनात मोठा व्यत्यय निर्माण झाला. 

मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस

भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 30 जून रोजी सकाळी 8 वाजता जारी करण्यात आलेल्या बुलेटीननुसार, दिवसभर मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये 24 तासांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. 

हे ही वाचा : सचिन अहिर सोडून गेले, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, ट्वीट तुफान व्हायरल

मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने सकाळी गर्दी असताना मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक ही मंदावली आहे. मात्र, लोकल ट्रेनवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. नवी मुंबईतील रहिशांनी प्रशासनाकडे नाले स्वच्छ करून जलनिःसारण प्रणाली सुधारण्याची मागणी केली आहे.