Maharashtra Weather : राज्यात विजांसह पाऊस घालणार धिंगाणा, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट

Maharashtra weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसासाठी पोषक असं हवामान तयार झालं आहे. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. काही विभागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच जाणून घेऊयात 29 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra weather

Maharashtra weather

मुंबई तक

• 05:00 AM • 29 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसासाठी पोषक हवामान

point

जाणून घ्या 29 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान

Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसासाठी पोषक असं हवामान तयार झालं आहे. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. काही विभागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच जाणून घ्या 29 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'बीजेपी नाही, ही बाबर जनता पार्टी, ओमरजेंच्या मतदारसंघात ठाकरे कडाडले

कोकण 

कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सूनचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबई, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस धिंगाणा घालणार असल्याची शक्यता आहे, याच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा घाटमाथा परिसर आणि सांगली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह घाटमाथा परिसर आणि इतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा आणि सोलापूर जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यामुळे सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. 

हे ही वाचा : चंद्रपूर : पाच वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय वृद्धाचा बलात्कार.. भयंकर घटना

विदर्भ 

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होणार आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे.