सिंधुदुर्ग : तरुण तुफान नाचला, स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी अन् सगळं संपलं VIDEO

मुंबई तक

28 Jun 2026 (अपडेटेड: 28 Jun 2026, 01:12 PM)

swimmiming pool death : मालवणमधील रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारताना इस्लामपूरच्या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Sindhudurg News

Sindhudurg News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्ग : तरुण तुफान नाचला

point

स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी अन् सगळं संपलं VIDEO

swimmiming pool death : मालवण तालुक्यातील वायरी येथील मालवणी पाहुणचार रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेणीक मिलिंद टाकळे (वय 25, रा. ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : अहिल्यानगर : बायकोचे गावातल्या परपुरुषाशी अनैतिक संबंध, नवऱ्याचं भयंकर पाऊल

चार फूट खोल स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी 

कागल येथील दहा मित्र पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते. त्यांनी वायरी येथील मालवणी पाहुणचार रिसॉर्टमध्ये मुक्काम केला होता. दुपारच्या सुमारास काही मित्र खोलीत होते, तर काही जण स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. यावेळी श्रेणीक टाकळे याने छोट्या स्विमिंग पूलमधील लहान मुलांसाठी असलेल्या सुमारे चार फूट खोल भागात आठ ते दहा फूट उंचीवरून उडी घेतली.

हेही वाचा : नवऱ्याकडून गर्भात वाढत असलेल्या बाळाची DNA चाचणीची मागणी, शेवटी भयंकर घडलं!

श्रेणीक याची उडी थेट पूलच्या तळाशी गेली अन्... 

स्विमिंग पूलची खोली कमी असल्यामुळे श्रेणीक याची उडी थेट पूलच्या तळाशी गेली आणि त्याचे डोके जोरात आपटले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. श्रेणीक हा अविवाहित होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर त्याचे वडील आणि इतर नातेवाईक रात्री मालवण येथे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर श्रेणीक टाकळे यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र पेडणेकर करीत आहेत.