मुंबईची खबर : मुंबईकरांनो 'ही' कागदपत्रे तयार ठेवा, लवकरच सुरु होणार SIR मोहीम

मुंबईत लवकरच मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. यासाठी बीएमसीतर्फे नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

• 04:29 PM • 28 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मुंबईकरांनो 'ही' कागदपत्रे तयार ठेवा

point

लवकरच सुरु होणार SIR मोहीम

Mumbai News : मुंबई शहर आणि उपनरगरात लवकरच SIR कार्यक्रम राबवला जाणार आहे. याविषयी बीएमसीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या विद्यमाने 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण-2026' (Special Intensive Revision - SIR) हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश होऊ नये हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

हे वाचलं का?

'या' कालावधीत BLO येणार घरी

30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या गृहभेटीदरम्यान, बीएलओ मतदारांना एक गणना अर्ज देतील. नागरिकांना या अर्जावर आवश्यक ती सर्व माहिती भरून आणि स्वतःची स्वाक्षरी करून त्याची एक प्रत अधिकाऱ्यांकडे तत्काळ परत करावी लागेल.  'voters.eci.gov.in' या वेबसाइटवर किंवा 'ECINet App' वर जाऊन मागील यादीतील स्वतःचा किंवा आई-वडिलांचा तपशील (जसे की नाव, मतदारसंघ, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक) उपलब्ध आहे.

हे ही वाचा : फडणवीसांबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, परभणीच्या सभेत काय म्हणाले?

ओळखीच्या पुराव्यासाठी...

जर एखाद्या नागरिकाचे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे नाव मागील मतदार यादीत (SIR) नसेल, तर त्यांना नवीन नोंदणीसाठी ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. यासाठी जन्माचा दाखला, पासपोर्ट, दहावीचे किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी अथवा जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक/टपाल कार्यालयाचे ओळखपत्र, किंवा शासनाने दिलेले इतर अधिकृत ओळखपत्र यांसारख्या 12 पैकी कोणतेही एक दस्तऐवज तयार ठेवावे लागेल. यासोबतच, नागरिकांनी स्वतःचे नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (फोटो) देखील सोबत ठेवणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : पैसा-पाणी: पेट्रोलच्या किंमती खाली येणार तरी कधी?

अडचणी असल्यास काय करावे?

या प्रक्रियेबाबत मतदारांना कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा '1800 22 1950' या टोल-फ्री मदतसेवा क्रमांकावर कॉल करावा. तसेच, मागील यादीतील तपशील शोधण्यासाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.