इंडियन ऑईलमध्ये मोठी भरती, लगेच करा अर्ज

इंडियन ऑईलमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentices) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे बी.एस्सी, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना कामाची प्रत्यक्ष संधी मिळणार आहे.

Government Jobs

Government Jobs

मुंबई तक

30 Jun 2026 (अपडेटेड: 30 Jun 2026, 05:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंडियन ऑईलमध्ये डिप्लोमाधरकांसाठी मोठी भरती,

point

लगेच करा अर्ज

Government Jobs : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने आपल्या चार प्रमुख रिफायनरी युनिट्समध्ये शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentices) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत बोंगाईगाव रिफायनरी (144 जागा), गुजरात रिफायनरी (647 जागा), मथुरा रिफायनरी (151 जागा) आणि पारादीप रिफायनरी (582 जागा) मिळून मोठ्या संख्येने जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे बी.एस्सी, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना कामाची प्रत्यक्ष संधी मिळणार आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 30 जून 2026 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड करण्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांनी त्यांच्या संबंधित शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या गुणवत्तेच्या (Merit) आधारावरच ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पात्रता निकषानुसार, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्ड, विद्यापीठ किंवा संस्थेतून नियमित पूर्णवेळ (Regular Full-Time) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे आणि ही शैक्षणिक पात्रता 30 जून 2026 पर्यंत पूर्ण झालेली असावी.

हे ही वाचा : 'मी पक्ष सोडलेला नाही...', सचिन अहिरांचा मोठा दावा.. बाजूलाच बसलेले शिंदे तात्काळ म्हणाले, अरे...!

अर्जाची तारीख

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 29 जून ते 28 जुलै या कालावधीत इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.iocl.com) जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. उमेदवारांना एनएपीएस/नेट्स (NAPS/NATS) पोर्टल आणि एमएस फॉर्म्स (MS Forms) द्वारे आपले अर्ज भरावे लागतील. वय आणि शैक्षणिक पात्रतेसाठी 30 जून 2026 ही तारीख कट-ऑफ डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे या तारखेपूर्वी सर्व अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचेच अर्ज ग्राह्य धरले जातील.

हे ही वाचा : 'सकाळी मला मेसेज पाठवला...', विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

'ही' आहे वेबसाईट

या भरती प्रक्रियेचे तात्पुरते वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, ऑनलाईन अर्जांची छाननी करून कागदपत्र पडताळणीसाठी (Document Verification) पात्र ठरलेल्या उमेदवारांची संक्षिप्त यादी 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर, निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. इंडियन ऑईलसारख्या नामांकित सरकारी कंपनीत काम करण्याचा अनुभव मिळवण्यासाठी आणि आपले करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी असून, पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज करावेत. पात्रतेचे संपूर्ण निकष जाणून घेण्यासाठी www.iocl.com या वेबसाईटला भेट द्यावी.