Govt Jobs : पदवीधरांसाठी मोठी संधी! IBPS कडून 6 हजारहून अधिक पदांची भरती

मुंबई तक

03 Jul 2026 (अपडेटेड: 03 Jul 2026, 04:39 PM)

IBPS द्वारे विविध सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँकांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली आहे.

IBPS Recruitment

IBPS Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

IBPS कडून 6 हजारहून अधिक पदांची भरती

point

पदवीधरांनो, लगेच करा अर्ज

IBPS Recruitment : IBPS द्वारे विविध सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँकांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी एकूण 6,715 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2026 पासून सुरू झाली असून, 21 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष काय?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 रोजी 20 ते 20 वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. अर्जाचे शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गासाठी 850 रुपये, तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी 175 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : प्रियकरासोबत रात्री हॉटेलमध्ये आली अन् सकाळी संशयास्पद मृत्यू, तरुणीसोबत काय घडलं?

'अशी' होणार परीक्षा

निवड प्रक्रियेचा विचार करता, उमेदवारांना प्राथमिक परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains), व्यक्तिमत्व चाचणी आणि मुलाखत अशा विविध टप्प्यांतून जावे लागणार आहे. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांचीच अंतिम नियुक्ती केली जाईल. अधिकृत माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला, म्हणजेच www.ibps.in ला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : अबब..! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरात 1.5 कोटींची रोकड, अर्धा किलो सोने...मोठं घबाड

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार असून, त्यांचा मूळ पगार दरमहा 48,480 रुपये असेल. याव्यतिरिक्त, वेळोवेळी लागू असलेल्या नियमांनुसार संबंधित बँकेकडून त्यांना विविध भत्ते आणि सुविधांचा लाभही मिळणार आहे. बँक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी असून, उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत नोंदणी करणे हिताचे ठरेल.