Maharashtra Weather : पुढील काही तास धोक्याचे, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्टचा अंदाज

मुंबई तक

• 05:00 AM • 06 Jul 2026

Maharashtra Weather : हवामान विभागाने विविध भागांना पावसाचा रेड, तर काही ठिकाणी यलो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. जाणून घ्या 7 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मुसळधार पावसाची दमदार हजेरी

point

6 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाने विविध भागांना पावसाचा रेड, तर काही ठिकाणी यलो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. जाणून घ्या 6 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : थकलेला चेहरा अन् अशक्तपणा, एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीची अपडेट, Photo व्हायरल

कोकण  

कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधालर ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. तर रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरासाठी पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा घाटामाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.  तसेच घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, याच ठिकाणी  पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आला. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

हे ही वाचा : पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात रस्ता फोडून उसळला पाण्याचा फवारा, Video व्हायरल

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच याच जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला.