Satara Accident : राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे, जिकडे तिकडे अपघाताच्या घटना घडू लागल्याचं दिसून येतंय. अशातच आता सातारा जिल्ह्यातील फलटण-पुसेगाव मार्गावर रविवारी भीषण अपघात घडला. ताथवडे घाटात दरड कोसळून चारचाकीचा चुरा झाला असून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं घाट परिसरात प्रवास करताना चिंतेची बाब निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईत एकाच दिवशी दोन बळी, झाड कोसळून दुर्दैवी अंत; मनसे आक्रमक
दरड कोसळून तरुणाचा मृत्यू
मृत चालकाची ओळख योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, ता. बारामती) समोर आली आहे. सध्या मान्सून सक्रिय असून धुव्वादार बॅटिंग करताना दिसतोय. अशा स्थितीत डोंगरातील काही भाग खचलेले किंवा दगड सैल झालेले असतात. यामुळे दरड कोसळण्याची अधिकची शक्यता असतात. अशा परिस्थितीत मोठे अपघात होतात.
हे ही वाचा : पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात रस्ता फोडून उसळला पाण्याचा फवारा, Video व्हायरल
मुंबईत अपघाताचं सत्र सुरूच
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. 7 जुलै 2026 रोजी साकीनाका आणि कुर्ला परिसरात दोघांचा झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. कुर्ला परिसरात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख ही युनूस कुंडवाल (वय 63) अशी समोर आली. तर साकीनाका परिसरात झाड कोसळलेल्या तरुणाची ओळख हसन रझा जहांगीर अली सय्यद (वय 18) शी समोर आली. तसेच मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. अशातच आता महापालिका प्रशासन हे अॅक्टिव्ह मोडवर दिसत आहेत. महापौर रितू तावडे हे ग्राऊंडवर उतरल्या आहेत.
ADVERTISEMENT












