मुंबईत एकाच दिवशी दोन बळी, झाड कोसळून दुर्दैवी अंत; मनसे आक्रमक

मुंबई तक

Mumbai Monsoon Accident : कुर्ला येथील नौपाडा परिसरातील हिंदी शाळेजवळ एकाच्या अंगावर झाड कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे साकीनाका परिसरात एका तरुणाच्या अंगावर झाड कोसळून त्याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला, या प्रकरणी प्रशासनाविरोधात मनसे रस्त्यावर उतरली आहे. एकाच दिवशी झालेल्या दोन अपघाताने शासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते.

ADVERTISEMENT

mumbai monsoon
mumbai monsoon
Google CTA

बातम्या हायलाइट

point

उपचारादरम्यान जखमी युनूस यांचा दुर्दैवी मत्यू 

point

आरे कॉलनीत झाड कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू 

Mumbai Monsoon Accident : मुंबईसह राज्यभरात पाऊस दमदार हजेरी लावत आहे. या पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकरांची दणादण उडाली आहे. अशा परिस्थितीत कुर्ला येथील नौपाडा परिसरातील हिंदी शाळेजवळ एकाच्या अंगावर झाड कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीची युनूस कुंडवाल (वय 63) अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात रस्ता फोडून उसळला पाण्याचा फवारा, Video व्हायरल

उपचारादरम्यान जखमी युनूस यांचा दुर्दैवी मत्यू 

जखमी युनूस यांना मुंबईच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, नंतर बचाव कार्यास सुरुवात देखील केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. 

आरे कॉलनीत झाड कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू 

आरे कॉलनीत एकावर झाड कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. हसन रझा जहांगीर अली सय्यद (वय 18) अशी मृत व्यक्तीची ओळख समोर आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. तरुण मोटारसायकलवरून जात असताना त्याच्या डोक्यावर झाडाची एक फांदी पडली, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुसळधार पावसाचा आणखी एक बळी, आतापर्यंत किती मुंबईकरांनी गमावले प्राण?

मनसे कार्यकर्ते आक्रमक

अशाच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आरे कॉलनी आणि कुर्ला या दोन घटनांनंतर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, त्यांनी हाताला काळया पट्ट्या बांधून स्थानिक प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, साकीनाका परिसरात एकाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. तसेच डोंबिवलीत मुलांना खाऊ आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा विजेच्या तारांना संपर्क आल्याने विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. तसेच आजच्या दिवशी मुंबईतील झाड कोसळून झालेल्या मृत्यूच्या दोन घटना समोर आलेल्या आहेत. 

हे वाचलं का?