Mumbai News: मुंबईसारख्या महानगरात दर तासाला सरासरी दोन लोक ‘ब्रेन स्ट्रोक’च्या आजाराचे शिकार झाल्याचे रिपोर्ट्स असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. लोकांमध्ये अजूनही स्ट्रोकच्या लक्षणांबद्दल जागरूकता नसणं ही आता चिंतेची बाब ठरत आहे, यामुळे 90 टक्के लोक गोल्डन पीरियड संपल्यानंतर रुग्णालयात येतात. आजारचं उशिरा निदान झाल्यामुळे न्यूरॉलॉजी म्हणजेच मज्जातंतूला नुकसान पोहचू शकतं. यामुळे अनेकांना तात्पुरतं किंवा कायमचं अपंगत्व येतं. म्हणूनच, डॉक्टर लोकांना स्ट्रोकची लक्षणे ओळखून वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन करतात.
ADVERTISEMENT
मुंबईत ब्रेन स्ट्रोकच्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करताना, मुंबईतील तज्ज्ञांनी सांगितलं की वेळेवर उपचार केल्यास रुग्णाचं आयुष्य वाचवता येतं. या उद्देशाने, सेरेब्रोव्हॅस्कुलर सोसायटी ऑफ इंडिया (CVSI) कडून शुक्रवारी न्यूरोव्हॅस्कॉन 2025 चं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, केईएम रुग्णालयाच्या डीन आणि वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. संगीता रावत म्हणाल्या की, भारतात दररोज सुमारे 3000 स्ट्रोकचे रुग्ण आढळतात आणि मुंबईसारख्या महानगरांमध्येही ही संख्या धक्कादायक आहे. एकट्या परळ परिसरात दररोज 8-10 स्ट्रोकचे रुग्ण आढळतात. चिंताजनक बाब म्हणजे सुमारे 90 टक्के रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचत नाहीत.
हे ही वाचा: मुंबईची खबर: देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण! ‘या’ स्थानकांदरम्यान बोगद्याचं बांधकाम अन्...
डॉक्टरांनी दिली माहिती...
डॉ. रावत यांच्या मते, स्ट्रोकची लक्षणे दिसू लागल्यानंतरचे पहिले साडेतीन ते चार तास खूप महत्वाचे असतात, ज्याला 'गोल्डन पीरिअड' म्हणतात. रुग्ण जितक्या अधिक वेळात येतो तितक्या जास्त मेंदूच्या पेशी मरतात आणि कायमचे नुकसान होऊ शकते. दर मिनिटाला लाखो न्यूरॉन्स नष्ट होतात, ज्यामुळे आजार बरा होण्याची शक्यता कमी होते.
हे ही वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, मुलाची इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट
कमी जागरूकता वाढत्या रुग्णांचं प्रमुख कारण
न्यूरोव्हॅस्कॉनचे आयोजन सचिव आणि न्यूरोसर्जन डॉ. बटुक दिओरा म्हणाले की, मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी रक्ताच्या गुठळ्यामुळे बंद होते तेव्हा इस्केमिक स्ट्रोक होतो. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि मेंदूच्या पेशी मरतात. दुसरीकडे, हेमरेजिक स्ट्रोक हा मेंदूतील धमनी फुटल्यामुळे होतो, बहुतेकदा उच्च रक्तदाबामुळे. स्ट्रोकची कमी जाणीव हे उपचारांमध्ये विलंब होण्याचे एक प्रमुख कारण आहे.
ADVERTISEMENT
