Mumbai News: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी घणसोली ते शिळफाटा दरम्यान 5 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं बांधकाम पूर्ण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कडून ही आनंदाची बातमी समोर आली आहे. हा बोगदा NATM (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड) वापरून बांधण्यात आला आहे. हा बोगदा 5 किमी लांबीचा (4.881 किमी) असल्याची माहिती आहे. तसेच, हा बीकेसी ते शिळफाटा पर्यंत बांधल्या जाणाऱ्या 21 किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचा एक भाग आहे. यापैकी ७ किमीचा भाग ठाणे क्रीकखाली बांधला जात आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत बोगदा बांधकामात सहभागी असलेल्या स्टाफची भेट घेतली.
ADVERTISEMENT
2024 मध्ये झाली सुरूवात
NHSRCL ने मे 2024 मध्ये बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या या भागासाठी NATM मधून तीन बाजूंनी बोगदा खोदण्याचे काम सुरू केलं होतं. पहिल्या 2.7 किमी बोगदा विभागाचा पहिला ब्रेकथ्रू 9 जुलै 2025 रोजी (ADIT आणि सावली शाफ्ट दरम्यान) पूर्ण झाला. या ब्रेकथ्रूसह, सावली शाफ्टपासून शिळफाटा येथील बोगद्याच्या पोर्टलपर्यंतचा 4.881 किलोमीटरच्या बोगद्याचा भाग पूर्ण झाला असूव हा बोगदा शिळफाटा येथील MAHSR प्रकल्पाच्या व्हायाडक्ट विभागाशी जोडला जाणार असल्याची माहिती आहे. या NATM बोगद्याची अंतर्गत उत्खननाची रुंदी 12.6 मीटर असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा भारत सरकारच्या ‘या’ संस्थेत नोकरी! थेट मुलाखत अन् पगार तर लाखोंच्या घरात...
NHSRCL च्या माहितीनुसार, उर्वरित 16 किलोमीटरचे बोगदे टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरून केले जातील. हा बोगदा 13.1 मीटर व्यास असलेला सिंगल ट्यूब बोगदा असेल ज्यामध्ये अप आणि डाउन दोन्ही मार्गांसाठी दुहेरी ट्रॅक असतील. जवळपासच्या निर्मितींचं नुकसान न होता सुरक्षित आणि नियंत्रित बोगदा बांधकाम प्रकल्प सुनिश्चित करण्यासाठी, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, पायझोमीटर, इनक्लिनोमीटर आणि स्ट्रेन गेजसह साइटवर व्यापक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत.
हे ही वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, मुलाची इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट
बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं किती काम पूर्ण?
- भारतातील पहिला 508 किलोमीटरचा बुलेट ट्रेन कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे.
- 508 किलोमीटरच्या मार्गापैकी 321 किलोमीटर मार्गाचे व्हायाडक्ट आणि 398 किलोमीटरचे खांब पूर्ण झाले आहेत.
- 17 नदी पूल आणि नऊ स्टील पूल सुद्धा पूर्ण झाले आहेत.
- 206 किलोमीटरच्या या मार्गावर 4,00,00 हून अधिक नॉइस बॅरिअर बसवण्यात आले आहेत.
- 206 किलोमीटरच्या ट्रॅक बेडचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
- सुमारे 48 किलोमीटरच्या मुख्य मार्गावरील मार्गांवर 2,000 हून अधिक ओएचई मास्ट बसवण्यात आले आहेत.
- पालघर जिल्ह्यातील सात पर्वतीय बोगद्यांवर खोदकाम सुरू आहे.
- गुजरातमधील सर्व स्थानकांवर सुपरस्ट्रक्चरचे काम अंतिम टप्प्यात आहे. तिन्ही उन्नत स्थानकांवर काम सुरू झाले आहे आणि महाराष्ट्रातील मुंबई भूमिगत स्थानकावर बेस स्लॅब कास्टिंग सुरू आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं ट्रायल रन 2026 मध्ये सुरू होणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत, गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं जात आहे. बुलेट ट्रेनचं ट्रायल रन सूरत आणि नवसारी दरम्यान होण्याची अपेक्षा आहे. बिलिमोरा जवळील बुलेट ट्रेन ट्रॅकचा बराचसा भाग पूर्ण झाला आहे आणि इतर टेक्निकल बाबी बसवण्याचं काम सुरू आहे.
ADVERTISEMENT
