Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा भारत सरकारच्या ‘या’ संस्थेत नोकरी! थेट मुलाखत अन् पगार तर लाखोंच्या घरात...
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) कडून स्पेशालिस्ट, पीजीएमओ तसेच सीनिअर रेसिडेन्ट पदांच्या 13 रिक्त जागांसाठी भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लेखी परीक्षेशिवाय मिळवा भारत सरकारच्या ‘या’ संस्थेत नोकरी

थेट मुलाखत अन् पगार तर लाखोंच्या घरात...
Govt Job: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) कडून स्पेशालिस्ट, पीजीएमओ तसेच सीनिअर रेसिडेन्ट पदांच्या 13 रिक्त जागांसाठी भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेऐवजी थेट वॉक-इन मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत मुलाखतीला उपस्थित राहू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी, उमेदवारांकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस (MBBS) किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, ज्युनियर स्पेशलिस्ट पदावर नियुक्त होण्यासाठी किमान 3 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे आणि सिनियर स्पेशलिस्ट पदासाठी 5 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.
हे ही वाचा: मुंबई: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार! मुंबई पोलिसांनी ‘असा’ केला घटनेचा खुलासा
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी पदांनुसार वयोमर्यादा देखील निश्चित केली आहे. स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 69 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे, म्हणजचे या पदासाठी अर्ज करण्यासाठी 69 वर्षे कमाल वय असणे अनिवार्य आहे. तसेच, पीजीएमओ पदासाठी कमाल वय 36 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: पुणे: सहकारी तरुणीला प्रपोज केलं, पण नकार मिळताच प्रचंड संतापला! रागाच्या भरात फेक आयडी, अश्लील फोटोज अन्...
किती मिळेल पगार?
ESIC मधील या पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देण्यात येणार आहे. ज्युनियर स्पेशालिस्ट पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना अंदाजे 1,06,000 रुपये मासिक वेतन मिळेल. तसेच, पीजीएमओ पदावर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना अंदाजे 58,000 रुपये मासिक वेतन देण्यात येईल. या भरतीच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणं अनिवार्य आहे. यामध्ये राज्य मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, दहावी उत्तीर्ण प्रमाण, जन्मतारीख सर्टिफिकेट, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि आधार कार्ड यासारख्या कागदपत्रांचा समावेश आहे.