अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, मुलाची इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट
Mahesh Manjrekar first wife Deepa Mehta Passed away : अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं निधन

महेश मांजरेकर यांच्या मुलाने इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट करत दिली माहिती
Mahesh Manjrekar first wife Deepa Mehta Passed away : अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं निधन झालंय. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या याने इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट करत आईच्या निधनाची माहिती दिली आहे. दरम्यान, दीपा मेहता यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात असून सत्या मांजेरकर याने आईचा जुना फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
दीपा मेहता यांनी फॅशन डिझायनर म्हणून मिळवली होती ओळख
दीपा मेहता या महेश मांंजरेकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. दीपा आणि महेश मांंजरेकर यांचे लग्न 1987 साली झाले होते. मेहता यांनी फॅशन डिझायनर म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्याकडून साड्यांचा ब्रँड देखील चालवला जात होता. दीपा मेहता यांच्या कन्या अश्वमी या देखील देखील मॉडेलिंग आणि सिनेक्षेत्रात नशीब आजमावत आहेत. दीपा मेहता यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुलं आहेत. मात्र, नंतरच्या काळात महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचा घटस्फोट झाला होता. मात्र, महेश मांजरेकर यांची दोन्ही त्यांच्या आईसोबतच राहात होती. महेश मांजरेकर यांनी दुसरा विवाह मेधा यांच्याशी केला होता. सई मांजरेकर ही मेधा यांची मुलगी आहे. ती देखील सिनेक्षेत्रात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.