भयंकर! कॅन्सरग्रस्त आजीला नातवानेच कचऱ्यात सोडलं, उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयांचे 9 तास उंबरे झिजवले

Mumbai News : मुंबईतील आरे कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नातवाने कॅन्सरग्रस्त आजीला कचऱ्यात टाकलं आहे. वृद्ध महिलेला त्वचेचा कर्करोग असल्याने तिच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत. वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांना तब्बल 9 तास फिरावं लागलं.

mumbai news goregaon police helps woman dumped in garbage

mumbai news goregaon police helps woman dumped in garbage

मुंबई तक

• 01:56 PM • 23 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

नातवाने कॅन्सरग्रस्त आजीला कचऱ्यात टाकलं

point

आजीला रुग्णालयात पाठवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

point

महिलेवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू

Mumbai News : मुंबईतील आरे कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नातवाने कॅन्सरग्रस्त आजीला कचऱ्यात टाकलं आहे. वृद्ध महिलेला त्वचेचा कर्करोग असल्याने तिच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत. पोलिसांनी वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी स्वीकारली. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांना तब्बल 9 तास फिरावं लागलं. सध्या वृद्ध महिलेला कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबई हादरली! 10 वर्षाच्या मुलीवर आईच्याच बॉयफ्रेंडनं केलं लैंगिक शोषण, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत व्हिडिओ बनवला

घटनेचा घटनाक्रम 

गोरेगावच्या आरे कॉलनीतील युनिट 32 च्या रस्त्याजवळील कचऱ्यात वृद्ध महिला होती. शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पाहणी केली. तेव्हा वृद्ध महिला कचऱ्यात व्हिवळत पडली होती. तिच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता, महिलेनं आपल्या नातवाबाबत धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली की, 'माझा नातू मला इथंच सोडून गेला आहे'. तिला पत्त्याबाबत विचारले असता, निटसा पत्ता सांगता आला नाही. 

पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी घेतली. पण काही रुग्णालयांनी महिलेला उपचारासाठी नकार दिला. पोलीस अनेक रुग्णालयांच्या प्रशासनाला विनंती करत होते, पण त्यांनी काहीही एक ऐकलं नाही. महिलेला योग्य उपचार मिळावे यासाठी आरे पोलीस पथक जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठवण्यासाठी वणवण फिरू लागले. शेवटी वृद्ध महिलेला संध्याकाळी साडेपाच वाजता कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांकडून घटनेला दुजोरा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितलं की, आम्ही महिलेला तिथंच सोडू शकत नव्हतो. गेली 9 तास आम्ही वृद्धाला घेऊन रुग्णालयात गेलो, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

हेही वाचा : उधारीवर सिगारेट न दिल्याने अल्पवयीन मुलाने दुकानदार महिलेवर सपासप...अन् महिला जागीच...

दरम्यान, वृद्ध महिलेची प्रकृती नाजूक असून तिला फारसं बोलता येत नाही. तिनं आपल्या नातवाचे नाव सांगितले होते. तिने मालाड आणि कांदिवली येथील मोघम पत्ता सांगितला. पोलिसांनी शोध घेतला पण तिचं घर सापडलं नाही. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने शोध घेणं अवघड होऊन बसलं आहे. पोलिसांनी महिलेचा फोटो सर्वत्र पसरवला असून पोलीस महिलेच्या कुटुंबाच्या शोधात आहेत, अशी माहिती वरिष्ट पोलीस रवींद्र पाटील यांनी दिली आहे.  

    follow whatsapp