Mumbai News: देशातील पहिल्या रो-रो ट्रेन सेवेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही सेवा महाराष्ट्र आणि गोवा दरम्यान गाड्या वाहतूक करण्यासाठी सुरु करण्यात आली. पण बुकिंग सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. तरीही, लोकांकडून त्यात फार कमी रस दाखवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
रविवारपर्यंत कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना या सेवेबद्दल विचारपूस करणारे फक्त 38 फोन आल्याची माहिती आहे. यापैकी फक्त एकाच व्यक्तीने 23 ऑगस्ट रोजी कोलाडहून सुरू होणाऱ्या प्रवासासाठी सीट बुक केली. कोकण रेल्वे (केआर) अधिकाऱ्यांच्या मते, अपुरं बुकिंग (16 पेक्षा कमी कोच) झाल्यास, ट्रिप रद्द केली जाईल आणि नोंदणी शुल्क परत केले जाईल.
रो-रो ट्रेन सेवेबद्दल प्रश्न
खरंतर, रो-रो ट्रेन सेवेमध्ये एका ट्रिपमध्ये 40 डबे बसू शकतात. ही सेवा महाराष्ट्रातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा पर्यंत न थांबता ती पुढे चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या आधी कोकण मार्ग रेल्वेसाठी अत्यंत वर्दळीचा बनत असल्याचं आपण पाहतो. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, रत्नागिरी आणि सावंतवाडी सारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर रो-रो ट्रेन थांबेल का? याविषयी बहुतेक प्रश्न विचारण्यात आले होते. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी येणाऱ्यांची गर्दी जास्त असते. या स्थानकांवर डबे चढवण्याची आणि उतरवण्याची सुविधा नसल्याने इथे थांबा होणार नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा: विद्यार्थ्यासोबत अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल आणि अश्लील चाळे... आरोपी शिक्षिकेवर पोक्सो अॅक्ट!
रेल्वे प्रवासी सेवा समितीचं मत
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे अक्षय महापाडी म्हणाले की, "12 तासांच्या रेल्वे प्रवासामुळे वेळ वाचणार नसून रस्त्याने प्रवास करण्यासाठीही 10 ते 12 तास लागतात. प्रति गाडी आणि प्रवाशांसाठी 7,875 रुपये भाडे खूप महाग आहे." त्यांच्या मते, या सेवेची कल्पना चांगली आहे, पण वेळ योग्य नाही. रेल्वेची ही सेवा नवीन वर्षाच्या आसपास सुरू व्हायला हवी होती.
हे ही वाचा: शरीरसंबंध ठेवताना तरुण घेतात गोळ्यांचे डोस, भोगावे लागतात विपरीत परिणाम, अहवाल आला समोर
रेल्वे प्रवासी संघटनांना भिती
रो-रो गाड्यांमुळे गणेश चतुर्थी विशेष गाड्यांसाठी जागा कमी पडणार असल्याची रेल्वे प्रवासी संघटनांकडून भिती व्यक्त केली जात आहे. तसेच मध्य रेल्वेने 250 आणि पश्चिम रेल्वेने 44 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. रेल्वे प्रवासी संघटनांच्या म्हणण्यानुसार, रो-रो गाड्या चालवण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर पूर्ण कर्मचारी (लोको पायलट, सहाय्यक, गार्ड, ट्रेन मॅनेजर) आणि जागेची आवश्यकता आहे. ही जागा गणेश चतुर्थी विशेष गाड्या चालवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
ADVERTISEMENT
