Navi Mumbai Crime: नवी मुंबई पोलिसांनी 10 वीच्या विद्यार्थ्याला अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करुन अश्लील चॅट्स केल्याच्या आरोपाखाली एका खाजगी शाळेतील शिक्षिकेला अटक केली. आरोपी शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांसोबत असं कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस आणखी दोन विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
व्हिडिओ चॅटवर अश्लील कृत्य
मंगळवारी नवी मुंबई पोलिसांनी एका 35 वर्षीय शाळेतील शिक्षिकेला अटक केली. या शिक्षिकेवर गेल्या वर्षी एका दहावीच्या विद्यार्थ्यासोबत व्हिडिओ चॅटवर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडित विद्यार्थ्याच्या आईने त्याच्या फोनमध्ये शिक्षिकेचे अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर विद्यार्थ्याच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली.
चॅट करताना शिक्षिका अर्धनग्न...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षका गेल्या दोन वर्षांपासून शाळेत शिकवत होती. जलसंवर्धनावर ऑनलाइन क्लास घेण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्याशी व्हिडिओ चॅटिंग केलं होतं आणि त्यावेळी विद्यार्थ्याने ते व्हिडिओ चॅट रेकॉर्ड केलं होतं. क्लासदरम्यान चॅट करताना शिक्षिकेने तिचे कपडे काढले आणि ती अर्धनग्न झाली. गेल्या आठवड्यात विद्यार्थ्याच्या आईने तिच्या मुलाच्या फोनमध्ये हा व्हिडिओ पाहिला असल्याची पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली. पीडित मुलाच्या आईने याबद्दल विद्यार्थ्याला विचारलं असता हे प्रकरण समोर आलं. सोमवारी (28 जुलै) रोजी महिला ते व्हिडीओ रेकॉर्डिंग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेली.
हे ही वाचा: पतीने आधी गळा कापला..पुन्हा सैरावैरा झाला अन् पत्नीच्या छातीवर वार केले, नवऱ्याने बायकोला माहेरीच संपवलं!
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने पुरावा म्हणून सादर करण्यात आलेल्या व्हिडिओच्या आधारे शिक्षकेविरुद्ध POCSO कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी पुढे सांगितलं. पोलिसांनी तक्रार केल्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी शिक्षिकेला अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आणखी दोन विद्यार्थीही अशाच प्रकारच्या तक्रारी घेऊन आले असून पोलीस आता त्यांचेही जबाब नोंदवतील.
हे ही वाचा: धक्कादायक! 14 वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म, डॉक्टरांनी पोलिसांना बोलावलं अन् मोठा खुलासा...
पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी शिक्षिकेचा मोबाईल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला आहे. यामुळे फोनमध्ये असे आणखी काही व्हिडिओ आहेत का? हे तपासता येईल.
ADVERTISEMENT
