Mumbai News: प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, मेट्रो-4 कॉरिडॉरच्या पहिल्या फेजवर सोमवार म्हणजेच आजपासून चाचणी सुरू झाली. डोंगरीपाडा आणि गायमुख स्थानकांदरम्यानच्या 4.638 किमी मार्गावर चाचणी सुरू झाली आहे. आता पुढील वर्षापासून घोडबंदर रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सोपा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सकाळी 10:30 वाजता गायमुख मेट्रो स्टेशनपासून ट्रायल सुरू झाली आहे.
10.5 किमी अंतरावर धावणार मेट्रो
एमएमआरडीए कडून पहिल्या टप्प्याअंतर्गत मेट्रो-4, मेट्रो-4 A च्या 10.5 किमी मार्गावर सेवा सुरू करण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. मात्र, ट्रायल रन म्हणजेच मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी पूर्ण 10 किमी मार्गावर वीज पुरवठ्याचं काम पूर्ण न झाल्यामुळे 22 सप्टेंबरपासून केवळ 4.638 किमी मार्गावर ट्रायल रन सुरू झालं आहे.
हे ही वाचा: Govt Job: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये 'या' पदांसाठी निघाली मोठी भरती! लाखोंचा पगार अन्... लवकरच करा अप्लाय
उर्वरित मार्गावर आवश्यक व्यवस्था आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा ट्रायल रन सुरू केलं जाईल. ट्रायल रन सुरू करण्यासाठी मेट्रोच्या 4.638 किमी मार्गावर 30 ऑगस्टपासून वीजपुरवठा सुरू झाला होता. ओव्हरहेड वायर चार्जिंग आणि ट्रेन चार्जिंगची चाचणी प्रक्रिया 21 दिवसांतच पूर्ण झाली आहे.
हे ही वाचा: आईचं चिमुकल्यासोबत निर्घृण कृत्य! एका वर्षाच्या मुलाला पूलावरून खाली नदीत... अमरावतीत घडली भयानक घटना
'या' स्थानकांवर धावणार मेट्रो
पहिल्या टप्प्याअंतर्गत कॅडबरी जंक्शन ते गायमुख स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम करण्यात येत आहे. 10 किमीच्या मार्गावर 10 मेट्रो स्टेशन असून कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवणीवाडा आणि गायमुख स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार असल्याचं सांगितलं जात आहे. वडाळा-कासारवडवली-गायमुख मार्गादरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो-4A मार्गिकेची निर्मिती केली जात आहे.
ADVERTISEMENT
