मुंबईची खबर: आता रेल्वे ट्रॅकवरून जाणार बीएमसीचा पहिलाच केबल-स्टेड पूल... कसं असेल कनेक्शन?

मुंबई महानगरपालिकेकडून महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील केशवराव खाड्ये मार्गावर केबल-स्टेड फ्लायओव्हर बांधणी करण्यात येत असून त्याचं काम सध्या सुरू असल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रोजेक्ट 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:48 PM • 24 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आता रेल्वे ट्रॅकवरून जाणार बीएमसीचा पहिलाच केबल-स्टेड पूल...

point

जाणून घ्या, कसं असेल कनेक्शन?

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेकडून महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील केशवराव खाड्ये मार्गावर केबल-स्टेड फ्लायओव्हर बांधणी करण्यात येत असून त्याचं काम सध्या सुरू असल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रोजेक्ट 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. केबल-स्टेड पुलासाठी 78.5 मीटर उंचीचा खांब बांधला जात असून त्याचं 55 टक्के काम पूर्ण झालं आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी खांब, रस्ते आणि सर्व सहाय्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून उड्डाणपूल 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल.

हे वाचलं का?

वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने नव्या पुलाची बांधणी  

महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा नवीन पूल बांधला जात आहे. विकास योजनेचा भाग म्हणून बांगर यांनी चालू कामाची पाहणी केली. रेल्वे ट्रॅकवर हा महानगरपालिकेचा पहिला केबल-स्टेड पूल असून तो पश्चिम रेल्वेला महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील सॅट रोड ते महालक्ष्मी मैदानापर्यंत जोडतो. हा पूल 803 मीटर लांब आणि 17.2 मीटर रुंद आहे. रेल्वेची बाउंड्री 23.01 मीटर रुंद असून उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने अलाइनमेंटमध्ये आवश्यक बदल केले आहेत. 

हे ही वाचा: Govt Job: भारतीय हवाई दलात सहभागी होऊन देशसेवेची सुवर्णसंधी... 12 वी पास तरुणांसाठी मोठी भरती

पायलॉन हा केबल-स्टेड पुलाच्या डिझाइनचा एक महत्त्वाचा घटक असून तो पुलाचे वजन सहन करतो. प्रस्तावित पुलासाठी 78.5 मीटर उंच पायलॉन बांधलं जात आहे. उंची आणि त्याची रचना म्हणजेच स्ट्रक्चर हे अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विशेषतः आव्हानात्मक आहे. पायलॉनची रचना प्रगत इंजीनिअरिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून करण्यात आली आहे, ज्यामध्ये उच्च दर्जाचे काँक्रीट आणि मजबूत स्टील घटकांचा समावेश आहे. 

हे ही वाचा: शाळकरी मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं अन् स्कूल व्हॅनमध्येच चालकाचा 14 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार...

टप्प्याटप्प्याने बांधकाम सुरू...  

तसेच, हे खांब टप्प्याटप्प्याने बांधला जात असून खांबाची स्थिरता आणि ताकद सुनिश्चित करण्यासाठी वारा, भूकंप, वाहतुकीचा ताण आणि दीर्घकालीन वापर यासह सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. यासोबतच, बांधकाम सुलभ करण्यासाठी खांबापेक्षा उंच असलेली एक विशेष क्रेन बांधकामाच्या ठिकाणी बसवण्यात आली आहे. या क्रेनचा वापर करून, खांब टप्प्याटप्प्याने बांधले जात आहे. या प्रोजेक्टचं काम वेळेवर पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp