मुंबईची खबर: मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग... कधी निघणार लॉटरी?

मुंबईतील बीएमसी निवडणुका हाय-प्रोफाइल होण्याची अपेक्षा असतानाच मुंबई महानगर प्रदेशात (MMR) येणाऱ्या मीरा- भाईंदरमध्ये निवडणुकीचा उत्साह वाढत असल्याचं दिसून येत आहे.

मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग...

मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग...

मुंबई तक

• 05:27 PM • 30 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग...

point

कधी निघणार लॉटरी?

Mumbai News: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची नागरिकांना प्रतिक्षा असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील बीएमसी निवडणुका हाय-प्रोफाइल होण्याची अपेक्षा असतानाच मुंबई महानगर प्रदेशात (MMR) येणाऱ्या मीरा- भाईंदरमध्ये निवडणुकीचा उत्साह वाढत असल्याचं दिसून येत आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती आहे. आतापर्यंत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी आरक्षण जवळपास निश्चित झालं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेतील कोणत्या जागा इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि महिलांसाठी राखीव राहतील हे ठरवण्यासाठी 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान लॉटरी निघणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

वार्डची रचना सुद्धा निश्चित झाली 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका प्रशासनाला ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना 17 ते 24 नोव्हेंबर दरम्यान दाखल करता येतील. मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी निवडणूक वार्डची रचना सुद्धा निश्चित झाली आहे. एकूण 24 वार्ड्समध्ये 95 सदस्यांसाठी निवडणूक होईल. महानगरपालिका प्रशासनाकडून 3 सप्टेंबर रोजी भौगोलिक वार्ड रचनेचा मसुदा जारी करण्यात आला. एकूण 95 जागांपैकी 27 टक्के (26 जागा) ओबीसी प्रवर्गातील सदस्यांसाठी राखीव असतील. तसेच, 50 टक्के म्हणजेच 48 जागा महिलांसाठी राखीव असतील.

हे ही वाचा: LIVE: भयंकर.. मुंबईला हादरवणारी घटना! दिवसाढवळ्या स्टुडिओमध्ये 15-20 मुलं ओलीस.. अ‍ॅक्टिंग स्टुडिओबाहेर दहशत

सध्याची लोकसंख्या ही 15 लाखांपेक्षा अधिक...

मागील निवडणूकीप्रमाणे, यावेळी सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्यांसाठी 4 जागा तसेच, अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्यांसाठी 1 जागा निश्चित करण्यात आली आहे. मीरा भाईंदरमध्ये या वर्षीच्या निवडणुका 2011 च्या जनगणनेनुसार घेतल्या जात आहेत. त्यावेळी लोकसंख्या 8,09,378 होती तसेच सध्याची लोकसंख्या ही 15 लाखांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. आयोगाच्या आदेशानुसार, जुन्या आकडेवारीनुसारच निवडणूक घेतल्या जाव्यात. 

हे ही वाचा: स्मशानभूमीत नग्न अवस्थेत महिला करत होती 'ते' कृत्य! गावकऱ्यांनी पाहिलं अन् तिला मारहाण करत गावभर फिरवलं...

2017 च्या निवडणूकांमध्ये भाजप पक्षाला एकूण 61 जागा मिळाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना पक्षाने त्यावेळी 22 जागा जिंकल्या होत्या. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 जागा मिळाल्या होत्या. आता, शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP)दोन गटात विभागले गेले आहेत. यावर मतदारांची प्रतिक्रिया पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

    follow whatsapp