Mumbai News: मुंबई विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत दोन 'सिल्व्हरी गिबन' सापडले असल्याची बातमी समोर आली आहे. कस्टम विभागकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन गिबन्सपैकी एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. गुप्त माहितीच्या आधारे कस्टम म्हणजेच सीमाशुल्क विभागाने संबंधित प्रवाशाविरुद्ध कारवाई केली असून प्रकरणातील आरोपीला कस्टम अॅक्ट आणि वन्यजीव कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
तपासणी करताना सिल्व्हरी गिबन...
या प्रकरणी एका कस्टम अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाच्या सामानाची तपासणी करताना त्याच्या बॅगेत दोन सिल्व्हरी गिबन सापडले. त्यातील एक गिबन हा दोन महिन्यांचा होता आणि दुसरा हा चार महिन्यांचा. हे गिबन प्रवाशाने त्याच्या ट्रॉली बॅगेच्या आत एका बास्केटमध्ये ठेवले होते. याबाबत अधिकाऱ्याने सांगितलं की, विमान प्रवासादरम्यान अशा प्राण्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. जरी संबंधित प्राणी हा आपला प्रवास पूर्ण करत असेल किंवा सिंडिकेटच्या क्लायंटने त्याला वाढवण्यासाठी चांगल्या सुविधा दिल्या तरी, अशा प्रजातींना त्यांच्या मूळ अधिवासाबाहेर जगण्याची शक्यता फारच कमी असते.
हे ही वाचा: Govt Job: टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! SEBI च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज...
इंडोनेशियच्या जावा बेटवर आढळते
सिल्व्हर गिबन हा एक लहान वानर असून त्याची फर निळसर-राखाडी रंगाची असते. ही प्रजाती इंडोनेशियच्या जावा बेटवर आढळते. आययूसीएनने सिल्व्हर गिबनला 'एन्डेन्जर्ड' म्हणजेच संकटग्रस्त या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. जंगलात आता या प्राण्याच्या प्रजातींची संख्या 2,500 हून कमी शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: बहिणीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरून दिवसाढवळ्या शेतात फेकला अन्... भावाचा भयानक कट
आरोपी प्रवाशाला अटक
कस्टम विभागाकडून अटक करण्यात आलेला आरोपी परदेशी नागरिक हा मलेशियाहून थायलंड आणि नंतर भारतात आला होता. सिंडिकेटच्या एका सदस्याने गिबन आढळलेली बॅग थायलंडमधील आरोपी प्रवाशाला भारतात पोहोचवण्यासाठी दिली होती. या सिंडिकेटने परदेशी नागरिकाच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. सीमाशुल्क (कस्टम) विभागाने आरोपीला अटक केली असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









