"एअरगनने त्याने आधी फायर केलं..." रोहित आर्या केससंबंधी मुंबई पोलिसांची माहिती... स्टुडिओच्या आत नेमकं काय घडलं?

काल (30 ऑक्टोबर) मुंबईतील पवईच्या आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं. या प्रकरणाबाबत आता मुंबई पोलिसांनी अधिकची माहिती दिली आहे.

"एअरगनने त्याने आधी फायर केलं..."

"एअरगनने त्याने आधी फायर केलं..."

मुंबई तक

31 Oct 2025 (अपडेटेड: 31 Oct 2025, 12:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रोहित आर्या केससंबंधी मुंबई पोलिसांची माहिती...

point

स्टूडिओच्या आत नेमकं काय घडलं?

point

पोलीस म्हणाले की, "एअरगनने त्याने आधी फायर केलं..."

Mumbai Rohit Arya Case: काल (30 ऑक्टोबर) मुंबईतील पवईच्या आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं. या प्रकरणाबाबत आता मुंबई पोलिसांनी अधिकची माहिती दिली आहे. खरं तर, घटनास्थळी हल्ल्यापूर्वी पोलिसांनी अपहरणकर्ता रोहित आर्याशी संवाद साधण्यात आणि त्याच्या मागण्या समजून घेण्यात जवळपास दोन तास घालवले. परंतु, सर्व प्रयत्न करूनही आरोपी रोहितने पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिला. मुंबई पोलीस प्रमुख देवेन भारती यांच्या म्हणण्यानुसार, रोहित आर्याने आधी गोळी चालवली आणि त्यानंतर, पोलिसांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. 

हे वाचलं का?

पोलिसांनी काय सांगितलं? 

पोलिसांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं की, "आम्ही आरोपीला जीव धोक्यात घालू देऊ शकत नव्हतो. आमच्या पथकाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. बंदिस्त पीडितांची सुरक्षितता हीच प्राथमिकता असल्याचं आमच्या पथकाने सांगितलं. पथकाची प्रतिक्रिया प्रोटोकॉलनुसार होती. आरोपीच्या मृत्यूनंतर, कायदेशीर तज्ञांनी दंडाधिकारी चौकशीची मागणी केली आहे." 

हे ही वाचा: Mumbai: धक्कादायक... मुंबईत मुलांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा मृत्यू, पोलिसांनी थेट केला एन्काउंटर

शालेय स्वच्छता प्रकल्पासाठी काम

खरं तर, व्हिडिओमध्ये किंवा पोलिसांच्या चौकशीदरम्यान आर्याने त्याच्या हेतूबद्दल सविस्तर माहिती दिली नसली तरी, 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या शालेय स्वच्छता प्रकल्पासाठी तो काम करत असल्याचं समोर आलं. त्याच्यावर 2 कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि त्याने यापूर्वी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपोषण देखील केलं होतं, अशी माहिती आहे.

दिपक केसरकरांनी केलं स्पष्ट...

याबाबत केसरकर म्हणाले की त्यांनी सहानुभूती म्हणून रोहित आर्याला वैयक्तिकरित्या काही पैसे दिले होते, तसेच आर्याने काही मुलांकडून सुद्धा थेट पैसे घेतले होते, असं शालेय शिक्षण विभागाने सांगितलं. मुलांना ओलीस ठेवण्याऐवजी, आरोपीने त्याचा हा मुद्दा विभागासमोर उपस्थित करायला हवा होता, असं केसरकर यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: बहिणीच्या अफेअरबद्दल कळालं अन् रुग्णालयात जाऊन थेट डॉक्टरवर हल्ला! मुंबईच्या केईएम रुग्णालयातील धक्कादायक घटना

सिक्योरिटी गार्डने दिली माहिती

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रोहित आर्याची 'अप्सरा मीडिया' नावाची एक कंपनी आहे, जी सामाजिक विषयांवर जनजागृतीचे व्हिडिओ बनवते आणि मोठ्या प्रमाणात मुलांसोबत काम करते. रोहित गेल्या पाच दिवसांपासून पवई येथील आरए स्टुडिओमध्ये त्याच्या वेब सिरीजसाठी ऑडिशन्स घेत होता. गुरुवारी (29 ऑक्टोबर) कास्टिंगचा शेवटचा दिवस होता. महावीर क्लासिक येथील स्टुडिओमधील एका सिक्योरिटी गार्डने या घटनेबद्दल सांगितलं की, ऑडिशन्स सकाळी 10 वाजता सुरू झाल्या आणि यासाठी नवी मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि राज्यातील इतर भागांतील मुले आधीच पोहोचली होती.

    follow whatsapp