Mumbai News: पनवेल ते कर्जत प्रवासासाठी लागणारा वेळ आता लवकरच कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या रेल्वे कॉरिडोरचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कॉरिडोरचं काम जवळपास 79 टक्के पूर्ण झालं असून मार्च 2026 पर्यंत हे कॉरिडोर सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी खुलं होणार असल्याची बातमी समोर आली आहे. पनवेल ते कर्जत दरम्यान या 29.6 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेमुळे भविष्यात प्रवास सुलभ होणार असून त्याचा अंदाजे खर्च 2782 कोटी असल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॉरिडॉरमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ अंदाजे 30 मिनिटांनी कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
हा प्रोजेक्ट जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. सध्या, स्थानकांवर फेन्सिंग म्हणजेच कुंपण घालण्याचं काम सुरू आहे. पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत स्थानकांवरील प्रवासी सुविधा तसेच ऑपरेशनल इमारतींचं काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
महत्त्वाचा उपनगरीय दुवा
हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर, पनवेल आणि कर्जत दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होणार असून यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या कॉरिडॉरमुळे पनवेल आणि कर्जत दरम्यान एक महत्त्वाचा उपनगरीय दुवा निर्माण होईल. यामुळे नवी मुंबई, रायगड आणि आसपासच्या परिसरांत रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि दैनंदिन प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ कमी होईल.
हे ही वाचा: Govt Job: आता 10 वी पास उमेदवारांनी मिळवा ISRO मध्ये नोकरी! जाणून घ्या पात्रता अन् पटापट करा अर्ज...
प्रमुख कामे अंतिम टप्प्यात
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) 3 अंतर्गत MRVC द्वारे हे काम केलं जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पनवेल आणि कर्जत येथील पूल, बोगदे, स्टेशन इमारती तसेच रेल्वे उड्डाणपुलांसह प्रमुख कामे अंतिम टप्प्यात आहेत. या योजनेत आधुनिक इंजीनिअरिंग डिझाइन समाविष्ट करण्यात आलं आहे आणि पर्यावरणीय बाबी लक्षात घेऊन, इकोलॉजिकल इम्पॅक्ट कमी करण्यासाठी फॉरेस्ट क्लिअरन्सला प्राधान्य देण्यात आलं आहे.
हे ही वाचा: इंस्टाग्रामवर झाली मैत्री; नंतर, विश्वास संपादन करून तरुणीवर बलात्कार! नोकरी देण्याचं आमिष अन्...
अधिकाऱ्यांनी दिली माहिती
एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर यांच्या माहितीनुसार, पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरमुळे एक नवीन आणि जलद पर्यायी मार्ग मिळेल. यामुळे, कर्जत पर्यंतचा प्रवास सध्याच्या कल्याण मार्गिकेपेक्षा कमी वेळात पूर्ण होईल. यामुळे प्रवाशांची सोय आणि कनेक्टिव्हिटी सुधारेलच याशिवाय, आजूबाजूच्या परिसरातील आर्थिक बाबींनाही चालना मिळेल. हा प्रोजेक्ट प्रादेशिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
ADVERTISEMENT











