Satara Crime : फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणातील अनेक धक्कादायक दावे समोर येऊ लागले आहेत. महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला, तसेच प्रशांत बनकरवर मानसिक, शारिरीक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे. या एकूण प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Satish Shah: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचं निधन, अवघ्यांना हसवणारा 'तो' तारा निखळला!
'माझ्या भावाला तिने प्रपोज केला...'
प्रशांत बनकरच्या बहिणीने धक्कादायक दावा केला आहे. ती म्हणाली की, माझा भाऊ निर्दोष असल्याचा आम्ही सिद्ध करू पीडित महिला माझ्या भावाला त्रास देत होती. त्यानंतर ती पुढे म्हणाली की, असा दावा प्रशांतच्या बहिणीने केला होता. त्यानंतर ती पुढे म्हणाली की, माझ्या भावाला तिने प्रपोज केला होता, पण त्याने नकार दिला. आपण एकाच घरातील कुटुंबाप्रमाणे आहोत असे म्हणत नकार दिला, त्यानंतर त्याने तिचा विषय सोडून दिला, असा प्रशांतच्या बहिणीने दावा केला.
'तिचे आणि आमचे घरातील संबंध'
मागील महिन्यात त्याची तब्येतही बिघडल्याने तो फलटणमध्ये आल्यानंतर त्याच्यावर त्या डॉक्टर तरुणीनेच उपचार केले होते. तिचे आणि आमचे बहीण भावासारखे संबंध होते, असे प्रशांतची बहीण म्हणाली होती. जर त्याने तिला चॉर्चर करण्याचा प्रयत्न केला असता तर ती आमच्यात घरगुती संबंधात कशी राहिली असती? असा प्रतिसवाल प्रशांत बनकरच्या बहिणीने केला आहे.
हे ही वाचा : पनवेल: भलत्याच मृतदेहवर अंत्यसंस्कार, कोणाच्या हातून घडली एवढी मोठी चूक?
त्यानंतर पुढे प्रशांतची बहीण म्हणाली की, तिने काहीही हातावरती लिहिलं असलं तरीही आम्ही आमचा भाऊ निर्दोष असल्याचं सिद्ध करणार आहोत. ती माझ्या भावाला मेंटली टॉर्चर करायची आणि सारखे कॉल करून त्रास द्यायची असा आरोप प्रशांत बनकर यांच्या बहिणीने दावा केला.
ADVERTISEMENT











