मोठी बातमी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण; आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने यांने फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये सरेंडर केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

मुंबई तक

26 Oct 2025 (अपडेटेड: 26 Oct 2025, 11:54 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण

point

आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

Satara Doctor Suicide case update: साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी (25 ऑक्टोबर) मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये सरेंडर केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यापूर्वी आरोपी प्रशांत बनकर याने शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती. पीडित महिला डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन्ही आरोपींची नावे आढळली होती. 

हे वाचलं का?

आरोपीने पीएसआयने केलं सरेंडर 

सातारा पोलिसांच्या माहितीनुसार, गोपाळ बदने पोलिसांना शरण आल्यानंतर त्याची आता सविस्तर चौकशी केली जात आहे. प्रकरणातील पीडित महिला डॉक्टरच्या आत्महत्या आणि छळाशी संबंधित तक्रारीचा तपास सुरू असल्याचं सातारा पोलीस अधिकारी तुषार दोशी यांनी सांगितलं. यापूर्वी, एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीने सरेंडर केल्यानंतर आता ताब्यात घेण्यात आलं आहे. दोघांची सखोल चौकशी केल्यानंतर सत्य लवकरच उघडकीस येऊ शकतं. 

तपासाला वेग 

पोलीस अधिकारी तुषार यांनी सांगितल्याप्रमाणे, घटनेतील मृत डॉक्टरने फलटण ग्रामीण पोलिसांच्या विरोधात 'फिटनेस सर्टिफिकेट' बाबत तक्रार केली होती. याच कारणामुळे पीडित महिला डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, आमच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल झाला असून त्याच्या अटकेसाठी सतत प्रयत्न केले होते, पण आता आरोपी पोलिसांना शरण आल्याने तपासाला वेग येणार आहे. 

हे ही वाचा: वादातून पत्नी माहेरी निघून गेली, संतापलेल्या वडिलांनी अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींना निर्जस्थळी नेलं अन्... बुलढाण्यात खळबळ

या घटनेत महिला डॉक्टरने लिहिलेल्या पत्रात माजी खासदार निंबाळकर यांनी पीएच्या मोबाईलद्वारे आरोपी अधिकाऱ्यांवर रिपोर्ट्स बदलण्यासाठी दबाव आणला असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. याबाबत चौकशी केली असता एसपी तुषार दोशी म्हणाले, डॉक्टरने जिल्हा सर्जनसाठी लिहिलेल्या पत्रात खासदाराचं नाव आहे, परंतु सध्याच्या गुन्ह्याशी त्याचा थेट संबंध दिसत नाही. हा एक वेगळा मुद्दा तो आत्महत्या प्रकरणाशी संबंधित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

हे ही वाचा: Personal Finance: वरकमाई, Saving नाही.. तरी 30 हजार पगारात जमवा लाखो रुपये!

पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आरोपी पीएसआय गोपाळ बदने याची चौकशी केल्यानंतर, मानसिक छळ आणि भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातूनही या प्रकरणाचा तपास केला जाऊ शकतो. दरम्यान, डॉक्टरच्या आत्महत्येमुळे आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

    follow whatsapp